व्हॉट्सअॅप चॅटवर आपण दररोज शेकडो मॅसेजेस पाठवतो आणि प्राप्त करतो. अशात एखादा जुना मॅसेज शोधायचा असल्यास खुप मोठी कसरत करावी लागते. सर्व मॅसेज स्क्रोल करत शोध मोहीम राबवाववी लागते.(WhatsApp Introduces Search For Messages By Date Feature) असे करणे म्हणजे निव्वळ वेळेचा अपव्यय आहे. पण आता मेटा, व्हॉट्सअॅपची मूळ कंपनीने, एक नवीन वैशिष्ट्य जारी केले आहे जिथे तुम्ही आता तारखेनुसार व्हॉट्सअॅप चॅट मॅसेज शोधू शकता. जर तुम्हाला मॅसेज पाठवला गेला तेव्हाची तारीख माहित असल्यास (किंवा अंदाजे कल्पना असल्यास) जुने मॅसेज लगेच मिळतात.
जगात सर्वाधिक वापरण्यात येत असलेले व्हॉट्सॲप आपल्या वापरकर्त्यांनसाठी नव नवे फिचर्स घेऊन येत असतो. याच श्रृंखलेत आता व्हॉट्सॲपने युझर्सयाठी सर्च बाय डेट फिचर आणले आहे.या नव्या फिचरच्या माध्यातून युझर्सला एका विशिष्ठ तारखेला पाठवलेला किंवा आलेला संदेश शोधण्यासाठी सहज मदत करते.आपण जर कोणाला एकादा मॅसेज पठवला तर तो कधी पाठवला हे आपल्याला आठत नाही. किंवा तो परत मिळवायचा असेल किंवा शोधायचा असेल तर डोके खाजवावे लागते.त्याचे काय किवर्ड होते ते देखील आठवत नाही. आता मात्र या नव्याने आलेल्या फिचरचा उपयोग करुन तुम्ही तो विस्मरणात गेलेला संदेश सहज मिळवू शकता.ते या नव्याने आलेल्या सर्च बाय डेट फिचरमुळे शक्य झाला आहे.हे करत असताना व्हॉट्सॲपच्या या फिचर मध्ये एक कॅलेंडरचे चिन्ह दिसते.जेव्हा केव्हा वापरकर्ता कोणता संदेश शोधण्याच्या प्रयत्नात असेल तेव्हा ते प्रदर्शित होते.त्या माध्यमातून तो मॅसेज किवर्ड टाकून तो जुना मॅसेज मिळवू शकतो. कॅलेंडरच्या चिन्हावर क्लिक केल्यास विशिष्ट तारीख निवडण्याच्या पर्यायासह कॅलेंडर उघडते. त्यावर क्लिक करताच त्या दिवसातील संदेशांची यादी समोर येते. त्यानुसार आपण तारीख निवडून आपले जुने मॅसेज मिळवू शकतो.