नागपूर ०७ : सार्वजनिक वाहतुकीत नागरिकांच्या पसंतीस उतरलेली वाहतूक सेवा म्हणजे नागपूर मेट्रो रेल सेवा. मेट्रो हे वाहतुकीचे सर्वोत्तम, सुलभ, सुविधाजनक, किफायतशीर आणि सुरक्षित साधन आहे. नोकरीपेशा लोकांसाठी, व्यावसायिकांसाठी आणि विशेषतः विद्यार्थ्यांसाठी मेट्रो अत्यंत उपयुक्त ठरत आहे. यामध्येच भर घालत नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट (एनसीआय) चे कर्मचारी मेट्रोने मोठ्या प्रमाणात कनेक्ट निदर्शनास आले आहे. आता पर्यंत सुमारे ६०० पेक्षा जास्ती कर्मचाऱ्यांनी महा कार्ड खरेदी केले आहेत.
उल्लेखनीय आहे कि, मेट्रो सुरु होण्यापूर्वी एनसीआयचे कर्मचारी स्टाफ बस ने शहरातून प्रवास करत आपल्या गंतव्यावर येत होते. परंतु आता हे चित्र बदलत आहे. आता सदर कर्मचारी शहरच्या इतर भागातून मेट्रोचा उपयोग करून न्यू एयरपोर्ट स्टेशन पर्यंत पोहोचतात आणि तेथून स्टाफ बस ने एनसीआय पर्यंत प्रवास करतात. ग्रीन ट्रान्सपोर्टचा पर्याय निवडून शहरातील ट्राफिक गर्दी कमी करण्यास एका प्रकारे मदत करीत आहेत.
महा मेट्रोने फेब्रुवारी २०२३ पासून विद्यार्थ्यांसाठी तिकीट दरात ३० टक्के सवलत उपलब्ध केली आहे. शिवाय शनिवार आणि रविवार या दोन दिवशी वीकएंड सवलत, फक्त १०० रुपयात डेली पास आणि महाकार्डने प्रवास केल्यास प्रत्येक प्रवासावर १० टक्के सवलत देखील महा मेट्रो देत आहे. यासोबतच राजपत्रित सुरीच्या दिवशी मेट्रोने परवा स्केलयास 30% सवलत मेट्रो प्रवाश्याना देण्यात येत आहे.
महा मेट्रोच्या प्रवासी सेवेमध्ये दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढ होत असून मेट्रो ट्रेनच्या वेळ देखील दर १० मिनिटांनी उपलब्ध करण्यात आल्या आहे. आता ३७ मेट्रो स्टेशन येथून सकाळी ६ ते रात्री १० वाजता पर्यंत मेट्रो सेवा नागरिकांन करता उपलब्ध असते.