Monday, November 18, 2024

Latest Posts

Manoj Jarange Patil Demands: सरसकट आरक्षणावर जरांगे पाटलांचे तीन पर्याय कोणते ?

Jarange Patil Latest News: मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी गुरुवारी आपले उपोषण मागे घेतले. राज्य सरकारच्या एका शिष्ट मंडळाने उपोषण मंडपात जाऊन जरांगे पाटील यांच्यासोबत प्रदीर्घ चर्चा केली आणि त्यानंतर जरांगे यांनी २४ डिसेंबर ही सरकारला अंतिम तारीख दिली आहे. या सोबतच जरांगे पाटलांनी तीन पर्याय सरकार पुढे ठेवले आहे. काय आहेत ते पर्याय (Jarange patil Presents Three demands to government as a compensation On Maratha coummunity reservation ).

मराठा आरक्षणाचे आंदोलन मागे घेण्यात आले असले तरी यामध्ये अजून स्पष्टा आलेली नाही.२४ डिसेंबर की २ जानेवारी आशा दोन तारखांचा घोळ यात काम आहे. सरकारच्या मुळावर आलेले हे आंदोलनाचा लवकर निपटारा व्हावा यासाठी सरकार खुद्द जरांगे पाटलाच्या भेटीला उपोषण मंडपात गेली आहे. पहिले उपोषणापेक्षा दुसऱ्यांदा झालेल्या उपोषणाने राज्यात रान पेटले आहे. अनेक ठिकाणी जोळपोळ सारख्या घटना घडल्याने याला हिंसक वळण लागले होते.मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाण पत्र द्या ही मागणी जरांगे पाटलांची होती.या मागणीला ओबीसींनी आपला विराध दर्शविला होतो.जरांगे  पाटलांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी या संर्भात अनेक वेळा चर्चा देखील झाल्यात मात्र त्या फिसकाटल्यात.मात्र यंदा पाठवण्यात आलेल्या शिष्टमंडाला अखेर यश आले आणि २४ डिसेंबर पर्यंत सरकाने आपली भूमिका स्पष्ट करण्याचा वेळ देण्यात आला आहे.सरसकट कुणबी प्रमाण पत्र कसे मिळणार या संदर्भातील संभ्रम जरांगे पाटील यांनी दूर करण्यासोबतच तीन पर्याय ठेवले आहेत. सरसकट प्रमाणपत्रासाठी जरांगे पाटील म्हणाले आम्ही तीन मुद्दे मांडले आहेत. यात एक जरी नोंद मिळाली तर कुणबी प्रमाण पत्र देणे शक्य आसल्याचे जरांगे पाटील म्हणालेत.तसेच त्या एका नोंदीवरुन रक्ताच्या नात्यातील इतर लोकांना कुणबी प्रमाणपत्र देणे शक्य होईल. नोंद मिळताच इतर सगेसोयरे यांना देखील त्याचा लाभ देता येईल असे मत जरांगे पाटील यांनी मांडले आहे.दोन तारखेचा संभ्रम देखील जरांगे पाटील यांनी दूर केला आहे. मुख्यमंत्र्यांनी २ जानेवारी पर्यंत मुद्दत माळाली असे म्हणटले होते. मात्र  निवृत्त न्यायाधिशांसोबत झालेल्या चर्चेत २४ डिसेंबर ही तारीख ठरली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Latest Posts

Don't Miss