राजकाराणाच्या प्रवेशा बद्दल हे दिले संकेत
नेहमी वादाच्या भोवऱ्यात राहणारी अभिनेत्री कंगणा रनौतने नुकतेच एक सूचक विधान प्रसार माध्यमांपुढे बोलताना केले आहे. (Kangana Ranaut Breaks Her Silence on Entry in Politics) कंगानाने राजकारणातील आपल्या प्रवेशा बद्दल संकेत दिले आहेत. नेमकी काय म्हणाली कंगना.
भारतीय सिनेमा श्रृष्टीत आपल्या अप्रतिम अभिनयाच्या माध्यामतून प्रेक्षकांची मने जिंकणारी कंगना नेहमीच आपल्या वक्तव्याच्या माध्यसातून चर्तेत राहिलेली आहे. मात्र आलिकडच्या काळात कंगनाचे राजकिय मंडळीच्याकडे भेटी गाठी वाढवल्याने तिच्याकडे बघण्याचा दृष्टीकोन आता बदलत जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी,उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी अदित्यनाथ यांच्या भेटी तीने घेतल्या आहेत.नुकतेच कंगनाचा तेजस सिनेमा प्रेकषकांच्या भेटीला आला होता. मात्र त्याला जनतेने फारसा प्रतिसाद न दिल्याने तो टाॅप फ्लाॅप ठरला आहे.अनेक सिनेमागृहातून तो पहिल्याच आठवड्यातून काढण्यात आला आहे.गेल्या काही महिन्यांपासून कंगना राजकारणात प्रवेश घेणार आशा चर्चा होत होत्या.या चर्चेला आता कंगनाने पूर्णविराम लावला आहे.नुकतेच कंगनाने गुजरातच्या द्वारका मंदिरात देवाचे दर्शन घेतले. देव दर्शन झाल्यावर प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी कंगनाला घेरत प्रश्नांचा मारा केला.या वेळी आपण राजकारणात प्रवेश घेणार का असा प्रश्न प्रसारमाध्यमांनी केला असता कंगनाने सूचक विधान केले आहे. नेहमी राजकारणावर आपले परखड मत मांडणारी कंगन म्हणाली जर श्रीकृष्णाची कृपा माझ्यावर असेल तर लोकसभा निवडणूक मी लढवेल असे विधान केले आहे. त्यामुळे आता कंगनावर श्रीकृष्णाची किती कृपा दृष्टी राहणार हे आगामी काळात स्पष्ट होणार आहे. कंगना लवकरच आपल्या इमर्जन्सी या आगामी चित्रपटाच्या माध्यामातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.या चित्रपटात कंगनाने इंदिरा गांधी यांची भूमिका साकारली आहे.