Ban On Banners India Vs Sri Lanka:सध्या राज्यात मराठा आंदोलनाने हिंसक वळण घेतले आहे.त्यात आज भारत विरुध्द् श्रीलंका असा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियवर होत आहे.(Banner Not Allowed In India Sri lanka Match on Wankhade stadium )या सर्व पाश्वभूमीवर पोलिसांनी स्टेडियमध्ये बॅनर बाजीसह काही वस्तूंवर प्रतिबंध घातला आहे.
विश्वचषाकातील ३३ व्या सामन्यात भारत श्रीलंकेसोबत भिडणार आहे.रोहित शर्माच्या नेतृत्वात भारत सलग सातवा सामना जिंकण्यास उत्सुक आसणार असून उपांत्या फेरीचा मार्ग सुकार करणार आहे.तर श्रीलंका देखील आपला दम दाखवण्यासाठी प्रयत्नशील आसणार आहे.या महत्वाच्या सामन्याचे पोलिसांवर मोठे दडपण आहे.मुंबईच्या पोलिसांनी प्रेक्षकांसाठी काही सूचना केल्या आहेत.मराठा आंदोलन बघता पोलिसांनी या सामन्यात बॅनर बाजीवर प्रतिबंध घातल्याची माहिती आहे. आंदोलक मैदानावर आक्षेपार्ह फलक आणू शकतात ज्यामुळे स्टडियमवर गोंधळ उडवला जाऊ शकतो.त्यामुळे आजच्या सामन्यात बॅनरवर बंदी घालण्यात आली आहे.तसेच ज्वलंशील वस्तू जसे लायटर आण्यास देखील बंदी घालण्यात आली आहे.पोलिसांनी अगदी सामन्याच्या दिवशी असा निर्णय घेतल्याने अश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. पोलिसांच्या गुप्त यंत्रणेला मैदानावर मराठा आंदोलक गोंधळ उडवणार याची पूर्व कल्पणा मिळाली असल्यामुळेच अगदी वेळेवर असा निर्णय घेतल्या गेल्याची चर्चा आहे.