Sunday, November 17, 2024

Latest Posts

iQoo Mobile Features Leak: पदार्पणापूर्वीच झाले मोबाईचे फिचर्स लीक

iQoo Mobile Features Leak:मोबाईल क्षेत्रातील नामांकित कंपनी iQoo लवकरच आपला नवा मोबाईल बाजारात आणत आहे.ही कंपनी नेहमी ग्राहकांसाठी अत्याधुनिक फिचर्स घेऊन येत असते.(Before Launching Mobile Features got Leak) पुढील आठवड्यात कंपनी आपला नवा मोबाईल लॉन्च करण्याच्या तयारीत आहे.मात्र त्यापूर्वीच नव्याने बाजारात येणाऱ्या या मोबाईचे फिचर्स लीक झाले आहे.

iQoo कंपनीने  ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी आपल्या नव्या मोबाईलच्या डिझाईन बद्दलची खास माहिती समाज माध्यमावर शेअर केली आहे.या मोबाईल मध्ये ५० मेगापिक्सल ट्रिपल रिअर कॅमेरा असण्याची शक्यता आहे.तर या मध्ये ६.७८ इंचाचा डिस्प्ले असण्याची शक्यता आहे.कंपनी पुढीच्या आठवड्यात iQoo 12 आणि iQoo 12 Pro लॉन्च करणार तयारीत आहे.हा नव्याने बाजारात येणारा मोबाईल गुगल अँड्रॉइड 14 वर चालण्याची शक्यता वर्तवली जात आहे.मात्र टिपस्टार अभिषेक यादवने आपल्या एक्स अकाऊंटवर या मोबाईलचे फिचर्स लीक झाल्याचे भाष्य केले आहे.त्याने बाजारात येण्या पूर्वीच हा मोबाईल कसा असू शकतो या बद्दलची माहिती शेअर केली आहे.  iQoo 12 प्रो या मोबाईल मध्ये या मोबाईल मध्ये सॅमसंगची E7 AMOLED स्क्रिन येऊ शकते. सध्या ग्राहक चांगला मेगा पिक्सल कॅमेरा असलेल्या मोबाईच्या नेहमी शोधात असतात.ही बाब लक्षात घेत कंपनीने त्यावर अधिक लक्ष दिले आहे. iQoo 12 मोबाईल मध्ये तीन रेअर कॅमेरा मिळण्याची शक्यता आहे.यात ५० मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड अँगल आणि ६४ मेगापिक्सलचा टेलीफोटो सेन्सर असण्याची शक्यता आहे.दोन्ही फोन मध्ये १६ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा मिळण्याची शक्यता आहे.

Latest Posts

Don't Miss