Saturday, January 11, 2025

Latest Posts

आदित्य ठाकरेंवर ४३.७६ लाखांचे कर्ज : संपत्ती किती?

| TOR News Network |

Aditya Thackeray Latest News :  शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी काल वरळी विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांनी गुरुवारी जोरदार शक्तिप्रदर्शन करून विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज दाखल केले.(Aditya Thackeray nomination filed) यावेळी ढोलताशांचा गजर, फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. सादर केलेल्या नामांकन अर्जातून आदित्य ठाकरेंची किती मालमत्ता त्यांच्या नावे आहे हे समोर आले आहे. (Aditya Thackeray wealth on his name)

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांनी वरळी विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी पक्षाने जोरदार शक्तिप्रदर्शन केले. पक्षाचे मुंबईतील पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या रॅलीत पक्षाचे नेते सुभाष देसाई, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, विधानसभेतील गटनेते अजय चौधरी, खासदार अरविंद सावंत, आमदार सचिन अहिर, सुनील शिंदे, विभाग संघटक सुधीर साळवी आदी सहभागी झाले होते. प्रत्यक्ष अर्ज भरताना उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे उपस्थित होते.

आदित्य ठाकरे यांनी यावेळी १५.४३ कोटी रुपयांची जंगम संपत्ती असल्याचे जाहीर केली आहे. (Aditya Thackeray wealth 15.43 crore) ६.०४ कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता आहेत. प्रतिज्ञापत्रातील तपशीलानुसार त्यांच्याकडे १.९ कोटी रुपये किमतीचे दागिने आहेत.

भेट म्हणून मिळालेल्या मालमत्तेचे मूल्य २.७७ कोटी रुपये असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे. भेट म्हणून देण्यात आलेल्या मालमत्तेत वडील उद्धव ठाकरे यांच्याकडून २०१३ साली खालापूर येथील जमिनीचे पाच भूखंड आणि आई रश्मी ठाकरे यांच्याकडून २०१९ साली ठाणे, घोडबंदर रोड आणि कल्याण येथील प्रत्येकी एक गाळा आहे. आदित्य यांच्यावर ४३.७६ लाख रुपयांचे कर्ज आहे. (43.76 lakh loan on Aditya Thackeray ) तसेच त्यांच्याकडे एक बीएमडब्ल्यू गाडी असून २०१९ मध्ये खरेदी केलेल्या या गाडीची किंमत ४.२१ लाख रुपये इतकी आहे. आदित्य यांच्याकडे रोख ३७,३४४ रुपये आहेत. सुमारे २.८ कोटी रुपये बँकांमध्ये जमा आहेत. म्युच्युअल फंड आणि शेअर्समध्ये त्यांची १० कोटी रुपयांची गुंतवणूक आहे.

Latest Posts

Don't Miss