Sunday, January 12, 2025

Latest Posts

मुंबईतील ४०० कोटींचा श्रीमंत बाप्पा माहित आहे का ?

| TOR News Network |

Mumbai Ganpati Idol 400 Cr News : मुंबईमध्ये गणेशोत्सवाची लगबग सुरु झाली आहे. अशात  भारतामधील सर्वात श्रीमंत गणेश मूर्तीसंदर्भातील नवी महिती समोर आली आहे. मुंबईच्या सर्वात श्रीमंत गणपती मूर्ती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या किंग्ज सर्कल येथील जीएसबी सेवा मंडळाने बाप्पाला 66 किलो पेक्षा अधिक सोन्याने सजवलं जातं.(66 Kg Gold by GSB Ganpati Mandal on Bappa Idol) तसेच या बप्पाला 300 किलो पेक्षा अधिक चांदीचे दागिने घातले जातात. तसेच गणेशोत्सवाच्या विमा पॉलिसीचा नावा विक्रम प्रस्थापिक केला आहे. मंडळाने यंदा त्यांच्या मंडपातील गणरायाच्या मूर्तीचा 400 कोटी 58 लाखांचा विमा उतरवला आहे. (GSB Ganpati Manda 400 cr Insurance)

समोर आलेल्या माहितीनुसार, मागील वर्षी म्हणजेच 2023 मध्ये जीएसबी सेवा मंडळाने 360 कोटी 40 लाखांचा विमा उतरवला होता. यंदा यामध्ये 40 कोटी 18 लाखांची भर पडली आहे. यंदा ‘द न्यू इंडिया इन्शोरन्स कंपनी लिमिटेड’ कंपनीच्या माध्यमातून विमा काढण्यात आला आहे. मंडळात बाप्पाच्या दर्शनासाठी येणारे भाविक, कार्यकर्ते, बाप्पाचे दागिने अश्या सर्व गोष्टींची सुरक्षा लक्षात घेता मंडळाने 400 कोटी 58 लाखांचा विक्रमी विमा उतरवण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष अमीत पै यांनी दिली आहे.

दरवर्षी मुंबईसह देशभरात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. लाखो भाविक मोठ्या उत्साहाने आणि भक्तिमय वातावरणात लाडक्या बाप्पाची सेवा करताना दिसतात. मुंबईमधील अनेक मोठ्या मंडपांमधील गणपतीची मूर्ती आणि गणेशोत्सव हा भारतामध्येच नाही तर परदेशातही आकर्षणाचा विषय असतो. या मोठ्या मंडळात लाखो भाविक देखील आपल्या बाप्पाच्या दर्शनाला येत असतात. याच सगळ्या गोष्टींचा विचार करुन मागील काही वर्षांपासून गणपती मंडळांकडून आवर्जून विमान काढला जातो. असाच विमा जीएसबी सेवा मंडळाने काढला असून हा विमा विक्रम रक्कमेचा आहे.

सालाबादप्रमाणे या वर्षी देखील जीएसबी सेवा मंडळाच्या बाप्पाचे पहिलं विराट दर्शन भाविकांना दिलं जाणार आहे. यंदा 5 सप्टेंबर 2024 रोजी सायंकाळी साडे सात वाजता भाविकांना गणरायाचं विराट दर्शन दिलं जाणार आहे. तर यंदा मंडळातर्फे गणेशोत्सव 7 सप्टेंबर ते 11 सप्टेंबर दरम्यान साजरा केला जाणार असल्याचे मंडळाने स्पष्ट करण्यात आले आहे.

मुंबईतील सर्वात श्रीमंत गणपती अशी ख्याती असलेल्या मुंबईतील जीएसबी सेवा मंडळ, किंग सर्कल येथील बाप्पाला 66 किलो पेक्षा अधिक सोन्याने सजवलं जातं. तसेच या बप्पाला 300 किलो पेक्षा अधिक चांदीचे दागिने घातले जातात. पाच दिवसांच्या या उत्सवात मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी येतात.

Latest Posts

Don't Miss