Saturday, January 11, 2025

Latest Posts

२७ लाख लाडक्या बहिणी अडचणीत

| TOR News Network |

Ladki Bahin Yojna Latest News : सध्या राज्यात लाडकी बहिण योजनांची फारच चर्चा आहे.मात्र आता योजनेचा लाभ मिळणाऱ्या २७ लाख बहिणा अडचणात आल्या आहेत.(27 Lakh Ladki Bahin in Trouble) 1 जुलै 2024 पासून राज्य सरकारकडून या योजनेची अंमलबजावणी करण्यात आली आहे. या योजनेचा लाभ मिळावा यासाठी राज्यातील अनेक महिलांनी सेतू केंद्रांवर आणि तहसील कार्यालयात मोठी गर्दी केली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेसाठी अर्ज केलेल्या 27 लाख महिलांना आता एका नव्या अडचणींचा सामना करावा लागणार आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेसाठी विविध जिल्ह्यातून लाखो महिलांनी अर्ज केले आहेत. मात्र यातील 27 लाख महिलांच्या खात्यात पैसे पाठवण्यास सरकारला अडचणी येत आहेत.(Govt in trouble to deposit money for ladki bahin yojana ) कारण या 27 लाख महिलांनी त्यांचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक केलेले नाही. त्यामुळे आता या महिलांसमोर नवीन पेच निर्माण झाला आहे.

लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरल्यानंतरही 27 लाख महिलांसमोर नवा पेच निर्माण झाला आहे. या 27 लाख अर्जदार महिलांचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नसल्याची माहिती समोर आली आहे. बँक खाते आधार कार्डशी लिंक नसल्याने सरकारकडून पैसे पाठवण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे येत्या तीन दिवसात 27 लाख महिलांनी त्यांचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करावे, असे आव्हान सरकारकडून करण्यात आले आहे. त्यामुळे आता लाडक्या बहि‍णींना अडचणींचा सामना करावा लागणार आहे.

Latest Posts

Don't Miss