Saturday, January 18, 2025

Latest Posts

गुजरातमधुन २००० कोटींचे ड्रग्ज जप्त

| TOR News Network | Gujarat Drugs Latest News : गुजरात जणू ड्रग्स तस्करीचा अड्डाच बनला आहे. येथे परत एकदा ड्रग्जचा मोठा साठा भारतीय नौदल, एनसीबी आणि गुजरात एटीएसने पकडला आहे. ही कारवाई कच्छमधील पोरबंदर किनारपट्टीवर करण्यात आली आहे.या कारवईत तब्बल ३३०० किलो ड्रग्ज जप्त करण्यात आलं आहे. एएनआयने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे. (3300 kg of drugs have been seized)

जप्त करण्यात आलेल्या ड्रग्जमध्ये ३०८९ किलो चरस, १६० किलो मेथॅम्फेटामाइन आणि २५ किलो मॉर्फिनचा समावेश आहे. याची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल २००० कोटी रुपये असल्याचं समजतंय. आतापर्यंतची ही सर्वात मोठी कारवाई आहे.

धक्कादायक बाब म्हणजे ड्रग्जच्या पॅकेटवर पाकिस्तानचं नाव आढळून आलंय. (Pakistan Name found on the packets of drugs) नौदल, एनसीबी आणि एटीएसने केलेल्या या संयुक्त कारवाईत ४ जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे. यामुळे ड्रग्ज रॅकेटचे मोठे रॅकेट उघड होण्याची शक्यता आहे. (Gujarat Drugs News)

भारतीय नौदलाकडून मिळालेल्या माहितीनुसार, दोन दिवसांपासून गुजरात येथील समुद्राच्या सीमेवर एक अज्ञात बोट उभी होती. ही बोट भारताच्या हद्दीत घुसल्यावर तिला थांबवून तपासणी करण्यात आली. यावेळी बोटीत २००० कोटींचे ड्रग्ज आढळून आले.

५ आरोपी पाकिस्तानी असल्याचा संशय

नौदलाने कारवाई करत बोटीतील ५ क्रू मेंबर्सना ताब्यात घेतले. पकडलेल्या बोटीतील ताब्यात घेतलेले ५ आरोपी पाकिस्तानी असल्याचा संशय आहे. सध्या त्यांची कसून चौकशी केली जात असून आरोपींना गुजरातमधील पोरबंदर येथे नेण्यात आले आहे.दरम्यान, हे ड्रग्ज कुठून आले आणि याचा पुरवठा नेमका कुणाला केला जाणार होता, याबाबत सध्या चौकशी केली जात आहे. तसेच या ड्रग्जशी इतर किती लोक जोडलेले आहेत. याचा शोध देखील घेतला जात आहे. जप्त केलेल्या ड्रग्जवर  ‘Produce of Pakistan’ असे नाव लिहण्यात आले होते.

Latest Posts

Don't Miss