Saturday, January 11, 2025

Latest Posts

२० नोव्हेंबर ते ६ डिसेंबर दरम्यान संयुक्त कुष्ठरोग आणि सक्रिय क्षयरुग्ण शोध अभियान राबविणार

सार्वजनिक आरोग्य विभागाचा उपक्रम

पुणे – #कुष्ठरोग आणि #क्षयरोगा च्या समूळ निर्मूलनासाठी राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत येत्या २० नोव्हेंबर ते ६ डिसेंबर दरम्यान #संयुक्त_कुष्ठरोग_शोध_अभियान आणि #सक्रिय_क्षयरुग्ण_शोध_मोहीम (sakriya shayrugna shodh mohim;) राबविण्यात येणार आहे. केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनेनुसार, या संयुक्त अभियानाची आखणी आणि नियोजन करण्यात आले असून, त्या अंतर्गत घरोघर सर्वेक्षणाद्वारे समाजातील लपलेले किंवा निदान न झालेले कुष्ठरुग्ण आणि सक्रिय क्षयरुग्ण शोधून त्यांना त्वरित औषधोपचाराखाली आणण्यात येणार आहे.
२० नोव्हेंबर ते ६ डिसेंबर २०२३ या कालावधीत होणाऱ्या संयुक्त कुष्ठरोग व सक्रिय क्षयरोग शोध मोहिमेसाठी राज्यभरात ६५,८३३ पथके तयार करण्यात आलेली आहेत. एक पथक एका दिवसात शहरी भागातील २५ आणि ग्रामीण भागातील २० घरांना भेटी देणार आहे. गृहभेटी अंतर्गत राज्यातील १ कोटी ७५ लाख घरांचे सर्वेक्षण केले जाणार असून, अंदाजे ०८ कोटी ६६ लाख लोकसंख्येचे सर्वेक्षण केले जाणार आहे, अशी माहिती आरोग्य विभागाच्या सहसंचालक (कुष्ठरोग व क्षयरोग) डॉ. सुनिता गोल्हाईत यांनी दिली आहे. नागरिकांनी आरोग्य विभागाच्या या विशेष अभियानाला सहकार्य करावे आणि कुष्ठरोग व क्षयरोगाच्या समूळ निर्मूलनासाठी आपले योगदान द्यावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार गेल्या ५ वर्षापासून राज्यात दरवर्षी कुष्ठरोग शोध अभियान राबविण्यात येते. यामध्ये १०० टक्के ग्रामीण लोकसंख्येची व साधारणतः २० टक्के शहरी लोकसंख्येची एक आशा सेविका व एक पुरुष स्वयंसेवकाच्या पथकाद्वारे प्रत्यक्ष शारीरिक तपासणी करुन संशयित लक्षणे असलेले रुग्ण शोधुन काढले जाणार आहेत. या संशयितांची वैद्यकिय अधिकाऱ्यांकडून तपासणी करुन कुष्ठरोगाचे निदान झालेल्या कुष्ठरुग्णांवर बहुविध औषधोपचार करण्यात येतील.
राष्ट्रीय क्षयरोग दूरिकरण कार्यक्रमांतर्गत केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार २०१७-१८ पासून राज्यात दरवर्षी जोखमीच्या भागामध्ये सक्रिय क्षयरुग्ण शोध मोहीम राबविण्यात येते. या मोहेमेंतर्गत घरोघरी सर्वेक्षण करून क्षयरोगाचे निदान झालेल्या रुग्णांवर मोफत औषधोपचार करण्यात येणार आहेत.

Latest Posts

Don't Miss