Monday, January 13, 2025

Latest Posts

भाजपच्या 20 आमदारांना नारळ ? पहिल्या यादीत डावलले

| TOR News Network |

Bjp Election latest News :  विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. (bjp first candidate list) पहिल्या यादीमध्ये 99 उमेदवारांना संधी देण्यात आली आहे. इतर राज्यांमध्ये भाजपनं नव्या चेहऱ्यांना संधी देण्याची रणनिती आखली होती, पण महाराष्ट्रात किमान पहिल्या यादीच तरी त्यांच्या या रणनितीचा फारसा प्रभाव दिसला नाही. थोडक्यात पक्षानं जुन्या शिलेदारांवर विश्वास टाकला. असं असलं तरीही पक्षाच्या 20 विद्यमान आमदारांना मात्र यादीत संधी देण्यात आली नाही. (20 bjp mla on waiting) त्यामुळे दुसऱ्या यादीत कोणाला संधी मिळते यासाठी ते २० विद्यमान आमदारांना भाजपने गॅसवर ठेवले आहे.

पक्षानं पहिल्या यादीत संधी दिली नसल्यामुळे आता भाजपचे हेच 20 आमदार गॅसवर असल्याचं म्हटलं जात आहे. आता या 20 जणांपैकी किती जणांना नारळ मिळणार? पक्ष कोणत्या जागांवर नव्या चेहऱ्यांना संधी देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 
भाजपची पहिली यादी जाहीर झाली असली तरीही या यादीत नाशिक मध्य, उल्हासनगर, बोरिवली, वर्सोवा, घटकोपर पूर्व, पेण, पुणे छावणी, गेवराई, माळशिरस, अकोट, अकोला पश्चिम, मूर्तिजापूर, कारंजा, वाशिम, आर्वी, नागपूर मध्य, गडचिरोली, आर्णी या मतदारसंघातील विद्यमान आमदारांना संधी मिळाली नसल्यानं आता त्यांची चिंता वाढली आहे.

भाजपने पहिल्या यादीत बहुतांश ठिकाणी विद्यमान आमदारांना संधी दिली तर, काही ठिकाणी नव्या चेहऱ्यांनाही संधी मिळाली. पण, जवळपास 20 आमदारांना मात्र संधी दिली नसल्यामुळं आता या नेतेमंडळींची चिंता वाढली आहे.

दरम्यान, भाजपची पहिली यादी जाहीर झाल्यानंतर वाशिम जिल्ह्यातील एकाही मतदारसंघातील उमेदवाराचा समावेश नसल्याने विद्यमान आमदारांसह इच्छुक उमेदवारांमध्ये कमालीची अस्वस्थता असल्याचं चित्र आहे. 2019 च्या निवडणुकीत वाशिम मतदारसंघातून भाजपचे लखन मलिक, तर कारंजा मतदारसंघातून भाजपचे स्व.राजेंद्र पाटणी यांनी विजय मिळविला होता. त्यामुळे महायुतीत या दोन्ही मतदारसंघांवर भाजपने प्रबळ दावा केल्याचं पाहायला मिळत आहे. याशिवाय रिसोड मतदारसंघातही मागील दोन वर्षां पासून विधानसभेसाठी इच्छुक उमेदवार अनंतराव देशमुख यांना पक्षात घेऊन कामाला लागण्याच्या सूचना दिल्या होत्या.

Latest Posts

Don't Miss