Saturday, January 11, 2025

Latest Posts

दहशतवाद्यांच्या अंधाधुंद गोळीबारात 18 जणांचा मृत्यू

| TOR News Network | Syria Terrorism Latest News : सीरियामधुन एक मोठी बातमी समोर आली आहे. दहशतवाद्यांनी तेथे तांडव घातला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दहशतवाद्यांनी पूर्व सीरियातील ग्रामीण भागामध्ये अंधाधुंद गोळीबार सुरु केला . यात १८ लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. तर अनेक लोक जखमी झाले आहेत. (18 Civilian killed by terrorist attack in Syria)

बुधवारी झालेल्या गोळीबारात ५० पेक्षा अधिक लोक बेपत्ता असल्याचं कळत आहे. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. ग्रामीण भागामध्ये काही लोक एकत्र काम करत होते. त्यावेळी दहशतवाद्यांनी त्यांच्यावर अंधाधुंद गोळीबार केला. अचानक सुरु झालेल्या या गोळीबारामुळे अनेकांना पळण्याची देखील संधी मिळाली नाही.

रिपोर्टनुसार, इस्लामिक स्टेट म्हणजे आयएसआयएसच्या दहशतवाद्यांनी पूर्व सीरियामध्ये हा हल्ला केला आहे. गावकरी काही फळं (ट्रफल्स) गोळा करत होते. या फळांची किंमत जास्त असते. सीरियामध्ये सध्या संघर्षाची स्थिती आहे. त्यामुळे अनेक लोक ट्रफल्स गोळा करण्यासाठी बाहेर पडत असतात.

जवळपास ५० लोक बेपत्ता

ब्रिटनमध्ये असलेल्या सीरियन ऑब्जर्वेटरी फॉर ह्युमन्स राईट्सने यासंदर्भात माहिती दिली आहे. जवळपास ५० लोक बेपत्ता आहेत. त्यामुळे आयएसने त्यांचे अपहरण केले असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. दाव्यानुसार, मृतांमध्ये सरकार समर्थक राष्ट्रीय सुरक्षा दलाच्या चार सदस्यांचा देखील समावेश आहे.

आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला

सरकारी मीडिया न्यूज दामा पोस्टनुसार, मृतांची संख्या ४४ आहे. दामा पोस्टने दावा केलाय की, इस्लामिक स्टेट दहशतवादी संघटनेने केलेला हा आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला आहे. हल्ला इराकच्या सीमेजवळ पूर्व प्रांत दीर अल-जौरच्या कोबाजेब शहरातील वाळवंटात झाला आहे.

सीरिया हा दहशतवादाने पिडलेला देश आहे. देशात गरीबीने उच्चांक गाठला आहे. याठिकाणी अमेरिका आणि इस्राइल मोठ्या प्रमाणात हल्ले करत असते. त्यामुळे या देशाची बिकट अवस्था आहे. ९० टक्क्यांपेक्षा अधिक लोक गरिबी रेषेच्या खाली असल्याचं सांगितलं जातं. मागील वर्षी देशात मोठा भूकंप आला होता. तेव्हापासून तर देश अधिक तळाला गेला आहे.

Latest Posts

Don't Miss