Sunday, January 12, 2025

Latest Posts

आयकर विभागाचा छापा : 14 कोटींची रोकड, 8 किलो सोनं आणि…

Nanded IT Raid News : नांदेड शहरात आयकर विभागाने आता पर्यंतची सर्वात मोठी कारवाई केली आहे. (IT Raid in Nanded) नांदेडच्या भंडारी फायनान्स (Raid on Bhandari finance) आणि आदिनाथ सहकारी बँकेवर आयकर विभागाच्या पथकाने छापा टाकला. (Raid on Adinath Cooperative Bank) या छाप्यात कोट्यवधींची बेहिशेबी मालमत्ता सापडली असून, ती प्राप्तिकर विभागाने जप्त केली आहे. (Unaccounted assets seized in nanded) कारवाईदरम्यान १४ कोटींची रोकड,८ किलो सोनं सापडले आहे,

या छाप्यात विभागाला भंडारी कुटुंबाची 170 कोटी रुपयांची बेहिशेबी मालमत्ता सापडली आहे. (170 cr unaccounted assets seized in nanded) एवढंच नव्हे तर 8 किलो सोनंही सापडलं. छापेमारीत सापडलेली 14 कोटींची रोकड मोजण्यासाठी अधिकाऱ्यांना तब्बल 14 तास लागले. आयकर विभागाच्या या कारवाईमुळे फायनान्स व्यापाऱ्यांमध्ये घबराट निर्माण झाली.

भंडारी कुटुंबातील विनय भंडारी, संजय भंडारी, आशिष भंडारी, संतोष भंडारी, महावीर भंडारी आणि पदम भंडारी यांचा नांदेडमध्ये खासगी फायनान्सचा मोठा व्यवसाय आहे. (it raid on bhandari family nanded) मात्र येथे करचुकवेगिरी झाल्याची तक्रार आयकर विभागाकडे आली होती. त्यामुळे पुणे, नाशिक, नागपूर, परभणी, छत्रपती संभाजीनगर आणि नांदेड या सहा जिल्ह्यांतील प्राप्तिकर विभागाच्या शेकडो अधिकाऱ्यांनी संयुक्त छापेमारी केली. शुक्रवार, 10 मे रोजी नांदेड येथील भंडारी फायनान्स आणि आदिनाथ सहकारी बँकेवर पथकाने छापा टाकला.

सुमारे 100 अधिकाऱ्यांचे पथक 25 वाहनांतून नांदेडला पोहोचले होते. (100 it officer in action at bhandari raid) या पथकाने अलीभाई टॉवर येथील भंडारी फायनान्स प्रायव्हेट लिमिटेडचे ​​कार्यालय, कोठारी कॉम्प्लेक्समधील कार्यालय, कोकाटे कॉम्प्लेक्समधील तीन कार्यालये आणि आदिनाथ अर्बन मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह बँकेवर छापे टाकले. याशिवाय पारसनगर, महावीर सोसायटी, फरांदे नगर, काबरा नगर येथील घरांवरही छापे टाकण्यात आले.

नांदेड जिल्ह्यात प्रथमच आयकर विभागाने अशी कारवाई केली आहे. आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी शुक्रवार, शनिवार आणि रविवार असे तीन दिवस कारवाई सुरू ठेवली. यावेळी सर्व कागदपत्रांची तपासणी करण्यात आली.

Latest Posts

Don't Miss