Monday, November 18, 2024

Latest Posts

कृषी क्षेत्रासाठी 1.52 लाख कोटींची तरतूद- अर्थमंत्री

| TOR News Network |

Budget 2024 -25 Latest News : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज संसदेत अर्थसंकल्प सादर करत आहेत.(Nirmala Sitharaman To Present 7th Budget) मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील हा पहिला पूर्ण अर्थसंकल्प  आहे.यात कृषी क्षेत्रासाठी 1.52 लाख कोटींची तरतूद करण्यात आली आहे. (1.52 lakh crore for agricultural sector) लोकसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात बुधवारपासून अर्थसंकल्पावर चर्चा सुरू होणार आहे. (Tomorrow Discusion on budget)

कृषी उत्पादन वाढविण्यार भर दिला जाणार आहे. गरीब कल्याण योजनेला पाच वर्षांची मुदतवाढ दिली जाणार आहे. शेतकऱ्यांसाठी डिजीटल प्लॅटफॉर्म सुरू करण्यात येणार आहे.भाजीपाला वाहतुकीसाठी साखळी पुरवठा विकसित करण्यात येणार. कृषी क्षेत्रासाठी 1.52 लाख कोटींची तरतूद करण्यात येणार आहे.(1.52 lakh crore for agriculture)

अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या, “4.1 कोटी तरुणांना रोजगार, कौशल्य आणि इतर संधी उपलब्ध करून देण्यासाठी 5 योजना आणि उपक्रमांचे पंतप्रधान पॅकेज जाहीर करताना आनंद होत आहे. (4.1 job for youth) त्यासाठी 2 लाख कोटी रुपये खर्च होणार आहे.(2 lakh cr for job assetment) शिक्षण, रोजगार आणि कौशल्यासाठी 1.48 लाख कोटी रुपयांची तरतूद केली आहे. “

आंध्र प्रदेशला अतिरिक्त 15 हजार कोटीचा निधी देणार. चेन्नई ते विशाखापट्टम इंडस्ट्रीयल कॉरिडोअर बांधणार. बिहारमध्ये रस्ते बांधणासाठी 26 हजार कोटी देणार. (26 thousand crore rs for bihar road )त्याशिवाय बिहारमध्ये मेडीकल कॉलेज होणारय.

बजेटमध्ये रोजगार, कौशल्य आणि MSME यावर फोकस असेल, असं निर्मला सीतारमण यांनी स्पष्ट केलं. उत्पादकता, रोजगार, कौशल्य, उत्पादन, सेवा, एनर्जी, सुरक्षा, इन्फ्रास्ट्रक्चर, जमीन सुधारणा, शहरी विकास आणि सुधारणा या नऊ क्षेत्रांना प्राधान्य असेल असं सीतारमण म्हणाल्या.

अर्थमंत्री म्हणाल्या,” आमच्या सरकावर लोकांनी विश्वास दाखविला आहे.(People belive our govertment) शेतकऱ्यांना जास्तीत जास्त एमएसपी देण्याचा प्रयत्न आहे. (trying giving more to farmer) जागतिक अर्थव्यवस्था संकटातून जातानाही देशाची अर्थव्यवस्था प्रगती पथावर आहे. महागाईमध्ये स्थिरता आहे. महागाई कमी करण्यासाठी सरकारकडून पाऊले उचलण्यात येत आहेत. गरीब, तरुण आणि महिलांचा अर्थसंकल्प आहे.”

बजट पूर्वी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली. (sitaraman meet president Droupadi Murmu) परंपरेनुसार अर्थमंत्र्यांनी संसदेत जाण्यापूर्वी राष्ट्रपती भवनात राष्ट्रपतींची भेट घेतली. यावेळी राष्ट्रपतींनी अर्थमंत्र्यांना अर्थसंकल्प सादर करण्याकरिता शुभेच्छा दिल्या आहेत.

Latest Posts

Don't Miss