•   Wednesday, October 8
तंत्रज्ञान

सारंकाही शोधून देणाऱ्या Google चा फुल फॉर्म कधी शोधलाय का?

अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजेशिवाय सोशल मीडिया हे देखील आपल्या जीवनाचे अविभाज्य भाग बनले आहे. यामध्ये गुगल ही अशी गोष्ट आहे ज्याच्याशिवाय आपलं आयुष्य अर्धवट आहे, असे म्हंटले तरी वावगं ठरणार नाही.


Google हे सर्च इंजिन आहे हे सर्वांनाच माहित असेल. अमुक एखादी गोष्ट, माहिती शोधायची म्हटलं सरळ हात मोबाईलकडे जातो आणि गूगल केलं जातं. पण सारंकाही शोधून देणाऱ्या गूगलचा फूल फॉर्म काय आहे, माहित आहे? किंवा कधी तो शोधलाय का? नाही ना… बरं तर आज आम्ही तुम्हाला तेच सांगाणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया याबद्दल…


दैनंदिन जीवनात वापर करणाऱ्या Google चा फुल फॉर्म ग्लोबल ऑर्गनायझेशन ऑफ ओरिएंटेड ग्रुप लँग्वेज ऑफ अर्थ आहे. आताच्या काळात कोट्यावधी लोक रोज गुगलचा वापर करत असतात मात्र काही मोजक्याच लोकांना याचा फुल फॉर्म माहित असेल. आपल्या आपल्याला न माहित असलेल्या गोष्टी शोधण्यासाठी गुगलचा वापर करत असतो.