| TOR News Network |
Pune Porsche Accident Case Update : पुण्यातील अपघातास जबाबदार ठरलेल्या अल्पवयीन आरोपीची आई शिवानी अग्रवालला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. (Shivani Agrawal Arrested) ब्लड सॅम्पल बदलल्याप्रकरणी शिवानी अग्रवालला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. (Shivani Agrawal Arrested For Changing Blood Sample)
१९ मेच्या मध्यरात्री विशाल अग्रवाल यांच्या अल्पवयीन मुलाने दारू पिऊन भरधाव वेगाने कार चालवत कल्याणीनगर येथए एका बाईकला धडक दिली. त्यामध्ये दोघांचा मृत्यू झाला. या अपघातानंतर पोलिसांनी त्याला अटक केली, मात्र त्याला अवघ्या काही तासांतच जामीन मिळाला. तसेच पोलिसस स्टेशनमध्येही त्याला स्पेशल ट्रीटमेंट मिळाल्याचा आरोप झाला. त्यामुळे नागरिक संतापले, समाजमाध्यमांमध्ये आणि समाजातही मोठ्या प्रमाणावर रोष व्यक्त झाला.
त्यानंतर याप्रकरणाची खोलात जाऊन चौकशी करताना पुणे पोलिसांनी त्याच्या वडिलांना आणि आजोबांना अटक केली होती. त्यापाठोपाठ आता आज या मुलाच्या आईला अटक करण्यात आली आहे. शिवानी अग्रवाल असं त्यांचं नाव आहे. अल्पवयीन आरोपी, त्याचे वडील विशाल अग्रवाल आणि आजोबा सुरेंद्र अग्रवाल यांना आधीच कोठडीत आहेत. तर आता त्याची आई देखील पोलिसांच्या ताब्यात असून तिची कसून चौकशी करण्यात येणार आहे.
याप्रकरणी अटक केल्यानंतर अल्पवयीन मुलाचे रक्ताच नमुने तपासणीसाठी ससूनमध्ये देण्यात आले. मात्र तेथे त्याच ब्लड सॅम्पल बदलण्यात आल्याचा आरोप झाला आला.(Blood Sample Changed) त्याप्रकरणी ससूनमधील दोन डॉक्टरांना, डॉ. अजय तावरे आणि श्रीहरी हळनोर यांना अटक करण्यात आली होती. त्यांनी पैसे घेऊन आरोपीच्या रक्त्याचे नमुने बदलल्याचे आरोप पोलिसांनी केला. याप्रकरणाची चौकशीसाठी समिती नेमण्यात आली होती. त्यानंतर या दोघांनीच ब्लड सॅम्पलमध्ये फेरफार केल्याचे समोर आले.
आरोपीचं रक्त बदलून एका महिलेचे रक्त देण्यात आल्याची चर्चा आहे. आता याप्रकरणी पोलिसांनी शिवानी अग्रवालला अटक करण्यात आली आहे. (Police arrested shivani agrawal)अल्पवयीन मुलाच्या रक्ताच्या बदल्यात जे रक्त दिलं गेलं ते शिवानी अग्रवाल यांचं होतं का? त्यांनी कुणाला फोन करुन मुलाला वाचवण्यासाठी मदत मागितली, अपघाताचा ब्लेम कोणाला डोक्यावर घेण्यास सांगितलं, असे सगळे प्रश्न त्यांना चौकशीदरम्यान विचारण्यात येऊ शकतात.
अल्पवयीन मुलाच्या ब्लड सॅम्पलमध्ये फेरफार झाल्याचं उघड झाल्यावर शिवानी अग्रवाल काही काळ बेपत्ता झाल्या होत्या, (Shivani Agrawal Was missing) मात्र अखेर आज पुणे पोलिसांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांना ताब्यात घेतलं. (Shivani Agrawal Arrested From home)