Monday, November 18, 2024

Latest Posts

रेलबस म्हणजे भविष्यातील प्रवासाचा नवा आविष्कार

| TOR News Network |

Railbus News : बदलते तंत्रज्ञान आणि त्या तंत्रज्ञानाला आत्मसात करणे ही काळाची गरज बनली आहे. यात भारत वेगवान तांत्रिक प्रगतीसाठी ओळखला जाणारा देश आहे. अशात आता शहरी प्रवासी वाहतूकीत क्रांती घडवण्यासाठी रेलबसचा उत्तम पर्याय समोर आला आहे. (Railbus a better alternative for travel in india)

देशात मेट्रो शहरांची संख्या वाढत असताना, शाश्वत, कार्यक्षम आणि ग्रीन मोबिलिटी सोल्यूशनची आवश्यकता आहे. मुंबई, दिल्ली, बंगळुरू,कोलकाता या सारख्या प्रमुख शहरांना अनेकदा वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागतो. अशात मेट्रो रेल असली तरी अनेक ठिकाणी त्याची कनेक्टीव्हिटी नाही. अशात प्रवाशांना त्यांच्या स्थळापर्यंत पोहचवण्यासाठी रेलबस उत्तम पर्याय म्हणून समोर आला आहे. (Railbus a best solution on traffic)

रेलबसचे फायदे व इतर माहिती (Advantages Of Railbus)

advantages of railbus

पर्यावरणपूरक रेलबस

शहरात लाखो वाहनांद्वारे होणारे वायू प्रदूषण आणि त्याचे घातक परिणाम आपण बघत आहोत. अशात रेलबस ही पर्यावरणपूरक सेवा देते.(Eco Friendly Railbus) प्रदूषण मुक्त रेलबस ही नैसर्गिक सोलर अॅनर्जीवर धावते. त्यामुळे प्रवासी वाहतूकीतून होणाऱ्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी रेलबस फायदेशीर ठरणार आहे.

उच्च कार्यक्षमता

high effeciency raibus

आधुनिक शहरांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी रेलबसने डब्यांची डिझाइन आरामदायक आणि आकर्षित केले आहे. यात ४ प्रवाशांपासून तर २० प्रवासी बसू शकतील अशी सोय करण्यात आली आहे. रेलबसची ऑपरेशनल पद्धत अनन्य साधारण आहे. गतीमान आणि सोयीस्कर व सुरक्षित प्रवास याची खात्री रेलबस देते.

परवडणारी रेलबस

भारतातील आर्थिक विविधता लक्षात घेता, कोणतीही सार्वजनिक वाहतूक व्यवस्था खिशासाठी अनुकूल असणे आवश्यक आहे. रेलबस गुणवत्ता किंवा कार्यक्षमतेशी तडजोड न करता प्रवासकरिता कमी भाडे आकारते.(Comparatively Railbus is Affordable to other)

रेलबसची मॉड्यूलर रचना

रेलबस डिझाईन करताना त्यात भारताचाही विचार केला गेला आहे.(Railbus in India) भारतात असलेल्या दाट लोकवस्तीची शहरे आणि लहान शहरी भागात सेवा देण्यास रेलबस सोयची आहे. (Railbus can run in Densely populated area) कमी जागेत आपली सेवा देण्यास रेलबस सक्षम आहे.

Latest Posts

Don't Miss