| TOR News Network | Eknath Shinde Sena Candidate List : पुढे होऊ घातलेल्या लोकसभेच्या निवडणुकांसाठी भाजपने महाराष्ट्रातील २० जागा जाहीर केल्या आहेत. तर शिंदे गट आणि अजित पवार गटाकडून उमेदवारी जाहीर करण्यात आले नाहीत. असे असताना शिंदे गटाची १२ जागांवरील संभाव्य उमेदवारांची यादी समोर आली आहे. यातील तीन विद्यमान खासदारांना डच्चू देण्याची शक्यता आहे. (Shinde Sena potential candidate Name Released)
सर्व्हेत तीन विद्यमान खासदारांच्या जागा धोक्यात
मंत्री संजय राठोड यांनी भावना गवळी यांच्या जागी निवडणूक लढवावी असा अहवाल भाजपने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिलाय. रामटेकचे खासदार कृपालजी तुमाणे आणि कोल्हापूचे खासदार संजय मंडलिक यांना डच्चू मिळण्याची शक्यता आहे. (Bhavna gawli,Krupal tumane,Sanjay mandlik will be dropped) भाजप आणि शिवसेनेच्या सर्व्हेत या तीन विद्यमान खासदारांची जागा धोक्यात असल्याचं समोर आलं होत. तर पालघरचे राजेंद्र गावीतहे भाजपमधून आलेले उमेदवार आहेत, त्यामुळे ही जागा भाजपाला जावू शकते किंवा गावीत पुन्हा शिवसेनेचे उमेदवार असू शकतात.
महायुतीकडून धक्कातंत्र वापरण्याची शक्यता
राज्यात भाजप लोकसभेच्या ३१ ते ३२ जागा लढविण्यावर ठाम होतं. तर शिवसेना शिंदे गटाला १२ ते १३ जागा आणि अजित पवार गटाला ४ जागा देण्याबाबत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचा विचारविनिमय सुरू होता.जागावाटपाचा अंतिम निर्णय हा दिल्लीत होणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे. (Mahayuti Seat Sharing will be final at delhi) उमेदवार निवडीमध्ये महायुतीकडून धक्कातंत्र वापरण्याची शक्यता असून अनेक विद्यमान खासदारांचं तिकीट कापलं जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे शिंदे गटासह भाजपच्या विद्यमान खासदारांमध्ये धाकधूक आहे.
कोणत्या जागेवर कोणाला मिळणार उमेदवारी?
१) हेमंत पाटील , हिंगोली
२) श्रीरंग बारणे, मावळ
३) भावना गवळी, वाशिम ( यांना मिळू शकतो डच्चू यांच्या जागी संजय राठोड यांना उमेदवारी मिळू शकते )
४) धैर्यशील माने, हातकणंगले
५) सदाशिव लोखंडे, शिर्डी
६) हेमंत गोडसे, नाशिक
७) कृपालजी तुमाणे, रामटेक (यांना मिळू शकतो डच्चू )
८) श्रीकांत शिंदे, कल्याण
९) राहुल शेवाळे, इशान्य मुंबई
१०) राजेंद्र गावीत, पालघर ( गावीत हे भाजपातून आलेले उमेदवार त्यामुळे ही जागा भाजपाला जावू शकते किंवा गावीत पुन्हा शिवसेनेचे उमेदवार असु शकतात )
११) प्रतापराव जाधव, बुलढाणा
१२) संजय मंडलिक, कोल्हापूर ( यांना मिळू शकतो डच्चू )