| TOR News Network | Solapur Lok Sabha News : मी ईडीला भीत नाही. (I am not afraid of ED) माझ्याकडे कारखाना नाही, संस्था नाही. नशीब शिंदेसाहेब त्यात पडले नाहीत. मी दिलखुलासपणे भाजपविरुद्ध बोलणार. सोलापूर जिल्ह्यात विरोधी पक्षाची मी एकमेव आमदार आहे.बाकी सर्व आमदार भाजपचे आहेत, भाजपचे आमदार सत्ताधाऱ्याविरुद्ध बोलत नाहीत. त्यामुळे नागरिकांच्या समस्या सत्याधाऱ्यासमोर मांडणार कोण? असा सवाल करत माझ्या भाजप प्रवेशाच्या फक्त अफवा आहेत, माझ्या रक्तात काँग्रेस आहे, असे मत आमदार प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केले. (Congress MLA Praniti Shinde)
मी लोकशाहीवर विश्वास ठेवते
सोलापूर लोकसभेसाठी भाजपकडून मी असल्याच्या अफवा पसरवत आहेत. मात्र माझ्या रक्तातच काँग्रेस आहे.(Congress in my blood) सर्वधर्मसमभाव या विचारावर माझा विश्वास आहे. मी कामावर विश्वास ठेवते. मी लोकशाहीवर विश्वास ठेवते आणि मी संविधानावर विश्वास ठेवते म्हणून मी काँग्रेसमध्ये आहे,” असे म्हणत आमदार प्रणिती शिंदे यांनी भाजपला टोला लगावला आहे.
दरम्यान, आगामी लोकसभा निवडणुकीत (Loksabha Election 2024 Solapur) सोलापूरमधून आमदार प्रणिती शिंदे यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. त्यामुळे प्रणिती शिंदे यांनी निवडणुकीची जोरदार तयारी सुरू केली आहे.(Praniti Shinde Seat Final For Lok Sabha) आगामी लोकसभेच्या अनुषंगाने सोलापूर लोकसभा मतदारसंघातील गावभेटीचा सपाटा लावला आहे.