Saturday, January 11, 2025

Latest Posts

मोदी म्हणाले हा तर फक्त ट्रेलर आहे….

| TOR News Network | Vande Bharat Train Inauguration : वंदे भारत ट्रेनच्या उद्घाटनावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विरोधकांवर निशाणा साधला आहे. देशातील तरुण ठरवतील त्यांना कसा देश हवा आहे, कशा पद्धतीची रेल्वे हवी आहे. पुढील १० वर्षांच्या कामाचा हा तर फक्त ट्रेलर आहे, मला तर आणखी पुढे जायचं आहे. (Pm Modi Slams opposition Party)

देशात वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत चालली आहे. अशात आगामी निवडणुका लक्षात घेता पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते अनेक विकासकामांचं उद्घाटन केलं जातंय. आज नरेंद्र मोदींनी एकूण १० नवीन वंदे भारत ट्रेनचे उद्घाटन केले. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना मोदींनी विरोधकांवर निशाणा साधलाय. ११ लाख कोटींच्या योजना आम्ही सुरू केल्या आहेत. यातील ८५ हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पाचे भुमिपूजन आम्ही करत आहोत. विकासचा हा चढता आलेख मला कमी होऊ द्यायचा नाही, असं मोदी म्हणाले.

स्थानिकांना प्राधान्य देण्याचा आमचा प्रयत्न

आज गुजरात आणि महाराष्ट्रात सुद्धा आम्ही योजना सुरू करत आहोत. वोकल फॅार लोकल योजना सुरू करून स्थानिकांना प्राधान्य देण्याचा आमचा प्रयत्न आहे. भारतीय रेल्वेला मोठे करण्यासाठी इच्छा शक्ती हवी जी आमच्या सरकारमध्ये आहे. आपल्या इन्फ्रास्ट्रकचरमध्ये खूप वाढ झाली. येत्या काळात तुम्हाला दिसले की त्यात अजून किती युधारणा होते, विकासकामांबाबत अशी माहिती मोदींनी यावेळी दिली.

विकसकार्य हे देशनिर्माणासाठी

वंदे भारत ट्रेनबाबत बोलताना नरेंद्र मोदी पुढे म्हणाले की, वंदे भारतला खूपच चांगला प्रतिसाद मिळत आहे. २०० जिल्हपर्यंत आज वंदे भारत ट्रेन येवून पोहचली आहे. रेल्वेला आधुनिक करत राहण्याचा आमचा प्रयत्न आहे. हे विकसकार्य हे देशनिर्माणासाठी आहे. हीच मोदीची गॅरेंटी आहे, असा इशारा मोदींनी विरोधांना दिला आहे.

Latest Posts

Don't Miss