Sunday, November 17, 2024

Latest Posts

यंदा राजेस्थानची जनता पॅटर्न बदलणार का ?

आज मतदान : अशोक गेहलोत की वसुंधरा राजे ?

Rajasthan Assembly Elections 2023 : सध्या भारतात पाच राज्यात विधानसभा निवडणूका होत आहेत.यात राजस्थानातची निवडणूक अधिक चर्चेत आहे.त्याचे मुख्य कारण म्हणजे इथल्या मतदारांनी प्रत्येक निवडणूकीत आलटून-पालटून कौल दिला आहे.त्यामुळे यंदा जनता राजेस्थाचा पॅटर्न बटलणार का याकडे अवघ्या देशाचे लक्ष लागले आहे. (Voting Today Vidhan Sabha nivadnuk Congress Vs Bjp Vasundhara Raje Vs Ashok Ghelot) काँग्रेसचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत व भाजपाच्या वसुंधरा राजे यांच्या थेट लढत येथे होत आहे.

पुढच्यावर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीची सेमीफायनल म्हणून विधानसभेच्या निवडणूकांकडे पाहिलं जात आहे.त्यामुळे काँग्रेस आणि भाजपा दोन्ही पक्षांसाठी ही निवडणूक महत्त्वाची आहे. आज राजस्थान विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होत आहे, राजस्थानात विधानसभेच्या एकूण 200 जागा आहेत. राजस्थानात मुख्य लढत काँग्रेस आणि भाजपामध्ये आहे. राजस्थानचा मागच्या काही वर्षातील राजकीय इतिहास पाहिला, तर इथल्या मतदारांनी आलटून-पालटून कौल दिला आहे. कुठल्याही एका पक्षाला सलग दोन टर्म सत्ता मिळालेली नाही. यावेळी हा पॅटर्न बदलतो का? याकडे राजकीय विश्लेषकांच लक्ष आहे. राजस्थानात सध्या काँग्रेसच्या अशोक गेहलोत यांचं सरकार आहे. निवडणुकीआधी त्यांनी मतदारांवर योजनांचा पाऊस पाडला होता. त्यामुळे मतदार कोणाला साथ देतात? याची उत्सुक्ता आहे.तर राजस्थानात मागच्या काही वर्षांपासून वसुंधरा राजे भाजपाचा चेहरा राहिल्या आहेत. त्यांनी भाजपाकडून मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेतेपद भूषवलं आहे. मतदारांनी कौल दिल्यास भाजपा पुन्हा त्यांनाच संधी  देणार की, नवीन चेहरा आणणार याची सुद्धा उत्सुक्ता आहे. आज राजस्थानात मतदानासाठी कडेकोट सुरक्षा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. आज मुख्यमंत्री अशोक गेहलोत, सचिन पायलट, वसुंधरा राजेसह 1862 उमेदवारांच भवितव्य मतपेटील बंद होणार आहे. भाजपा आणि काँग्रेस दोन्ही पक्षांनी जोरदार प्रचार केला आहे. दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी मोठ्या प्रमाणात रॅली, सभांना संबोधित केलं आहे. rajasthan vidhan sabha election result on 3 december 2023 राजस्थान विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 3 डिसेंबरला होणार आहे.

 

Latest Posts

Don't Miss