Monday, November 18, 2024

Latest Posts

विदर्भाचा जितेश शर्मा भारतीय क्रिकेट संघात

23 नोव्हेंबरपासून ऑस्ट्रेलिया विरुध्द टी-२० मालिका

Indian Cricketer Jitesh Sharma News: आता एकदिवसीय विश्वचषक संपला आहे. त्यामुळे आता सर्वांचे लक्ष भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील टी-२० मालिकेकडे वळले आहे. ही मालिका 23 नोव्हेंबरपासून विशाखापट्टणम येथे खेळवली जाणार आहे. त्यासाठी नुकतीच भारतीय संघाची घोषणा झाली असून यात विदर्भाच्या जितेश शर्माची निवड करण्यात आली आहे. (Vidharbha Skipper Jitesh Sharma Selected For India Australia upcoming five-match T20I series)

मूळ अमरावतीचा असलेला जितेश हा यष्टीरक्षक व तडाखेबंद फलंदाज आहे. त्याने 3 अक्टोंबर 2023 साली आशियाई स्पर्धेत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले आहे.त्याने विदर्भ क्रिकेट संघाचे प्रतिनिधीत्व केले आहे. 30 वर्षीय जितेश 2016 साली आयपीएल मध्ये मुंबई इंडियन्स संघात होता.2022 पोसून तो पंजाब किंग्जकडून खेळत आहे.जितेशला टी 20 सामने खेळण्याचा मोठा अनुभव असून त्याने शतकही झळकवले आहे.त्यामुळे विदर्भाच्या जितेशकडून होऊ घातलेल्या टी-२० मालिकेत मोठी खेळीची अपेक्षा विदर्भातील जनतेची असणार आहे.या मालिकेत रोहित शर्मा आणि विराट कोहली यांना संघात स्थान देण्यात आलेले नाही. या मालिकेसाठी भारतीय संघातील अनुभवी खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. त्यामुळे या संघात युवा खेळाडूंना जास्त संधी देण्यात आली आहे. हार्दिक पंड्या दुखापतीमुळे वनडे विश्व क्रिकेट संघातून बाहेर पडल्याने कर्णधारपदासाठी ऋतुराज गायकवाड आणि सूर्यकुमार यादव आघाडीवर होते. कारण पुढच्या वर्षी आता टी-२० वर्ल्ड कप होणार आहे. त्यामुळे आतापासून या संघाची बांधणी करण्यात येणार आहे. हार्दिक पंड्या हा भारताच्या टी-२० संघाचा कर्णधार आहे. पण वनडे वर्ल्ड कप खेळताना त्याला गंभीर दुखापत झाली आणि त्यामुळे तो बराच कालावधी संघापासून लांब राहणार आहे. त्यामुळे हार्दिकच्या अनुपस्थितीत कोणाकडे भारताचे नेतृत्व जाणार, याची जोरदार चर्चा सुरु झाली होती.

द्रविडचा करार संपुष्टात

ऑस्ट्रेलिया विरुध्द होणाऱ्या टी-२० मालिकेत भारतीय संघाचे प्रशिक्षक राहुल द्रविड नसणार आहेत. कारण द्रविड यांचा बीसीसीआय सोबतचा करार हा संपला आहे. त्यामुळे यापुढे त्यांच्याशी नवा करार होणार की नाही, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे आता या भारतीय संघाबरोबर नवा प्रशिक्षक असेल असे म्हटले जात होते.

असा असणार भारतीय संघ

सूर्यकुमार यादव (कर्णधार), रुतुराज गायकवाड (उपकर्णधार), इशान किशन, यशस्वी जैस्वाल, टिळक वर्मा, रिंकू सिंग, जितेश शर्मा (विकेटकीपर), वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, शिवम दुबे, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, प्रसिध कृष्णा, आवेश खान, मुकेश कुमार.

Latest Posts

Don't Miss