Sunday, January 12, 2025

Latest Posts

सिनेट निवडणुकीत युवा सेनेचा दबदबा कायम ; अगोदर पोराशी निपटा…बापाचा विषय तुमच्या बसचा नाही

| TOR News Network |

Senate Election Latest News : मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीचा अधिकृत निकाल आज जाहीर करण्यात आला. या निवडणुकीत 10 पैकी 10 जागा जिंकत ठाकरेंच्या युवा सेनेने दणदणीत विजय संपादन केला आहे. (yuva sena won senate election ) आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील युवा सेनेने सिनेट निवडणुकीत क्लीन स्वीप करून पुन्हा एकदा विद्यापीठावर आपलाच दबदबा असल्याचं दाखवून दिलं. युवासेनेच्या उमेदेवारांनी अभाविपला व्हाईट वॉश दिला आहे. (yuva sena whight wash abvp in Mumbai university senate election) भाजपसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. या विजयानंतर शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि युवासेनेने आनंदोत्सव साजरा केला. तर या विजयामुळे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी महायुतीचा खरपूस समाचार घेतला आहे.(Ambadas danve on senate victory)

याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी ‘एक्स’ या सोशल मिडिया साईटवरील त्यांच्या अधिकृत अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर करत या विजयाबद्दल आभारा मानले आहेत. (Aditya Thackrey on senate election win) तर ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे तसेच अयोध्या पौळ यांनीही पोस्ट शेअर करत विरोधकांना डिवचलंय. ‘अगोदर पोराशी निपटा.. बापाचा विषय तुमच्या बसचा नाही! ‘असे म्हणत या नेत्यांनी विरोधकांवर निशाणा साधला.

सिनेट निवडणुकीतील विजयानंतर आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली. ‘ पुन्हा एकदा 10 पैकी 10 जागा. ज्यांनी ज्यांनी आम्हाला मतदान केलं त्यांना आणि शिवसेना आणि युवा सेनेच्या माझ्या सहकाऱ्यांना, सर्वांना खूप धन्यवाद. तुम्ही दाखवलेला विश्वास, पाठिंबा, घेतलेली मेहनत आणि आशीर्वाद याबद्दल आभारी आहे. आम्ही फक्त विजयाची पुनरावृत्ती केली नाही तर आमचा परफॉर्मनस्ही लक्षणीयरित्या सुधारला. इथूनच विजयाची सुरूवात होत्ये! ‘ असे लिहीत आदित्य ठाकरेंनी सर्वांचे आभार मानले.

Latest Posts

Don't Miss