Saturday, January 11, 2025

Latest Posts

अशी होणोर विश्वचषकाची क्लोजिंग सेरेमनी: World Cup Closing Ceremony 2023

एअर शो आणि बॉलिवूड स्टार्सचा दिसणार जलवा ?

World Cup 2023 Closing Ceremony: रविवारी 19 नोव्हेंबरला भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान विश्वचषकाचा अंतिम सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगणार आहे. या अंतिम सामन्यापूर्वी क्लोजिंग सेरेमनीची मोठी रंगत पाहायला मिळणार असल्याची चर्चा आहे.अनेक बॉलिवूड स्टार्सचा येथे येणार असून एअर शोचाही व्हिडीओ व्हायरल झाला आहे. (How Will be 2023 World Cup Closing Ceremony at Narendra Modi Stadium Ahmedabad)

विश्वचषकाच्या अंतिम सामन्यापूर्वी क्लोजिंग सेरेमनी होणार का? हा प्रश्न अनेकांच्या मनात आहे. कारण वर्ल्ड कपचा शुभारंभ होताना ओपनिंग सेरेमनी झाली नव्हती. आता विश्वचषकाचा अंतिम सामन्याला केवळ दोन दिवस उरले आहेत. संपूर्ण देशात या विश्वचषकाच्या अंतिम सामन्या बद्दल मोठा उत्साह आहे. कारण टीम इंडियाने मोठ्या दिमाखात अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. सर्वात मोठ्या अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये टीम इंडिया आणि परंपारिक प्रतिस्पर्धी ऑस्ट्रेलियामध्ये अंतिम लढत  होणार आहे. टीम इंडियाने न्यूझीलंडला तर ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेला पराभूत करुन अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.अंतिमच्या आधी क्लोजिंग सेरेमनी होणार का? हा अनेकांच्या मनात प्रश्न आहे. आयसीसी आणि बीसीसीआय या क्लोजिग सेरेमनीबद्दल मौन बाळगळून आहेत. पण नरेंद्र मोदी स्टेडियमवर क्लोजिंग सेरेमनची तयारी सुरु असल्याच दिसून येत आहे. स्टेडियममधल्या तयारीचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. बॉलिवूड स्टार्स या क्लोजिंग सेरेमनीच्या पहिले परफॉर्म करण्याची शक्यता आहे. तर इंडियन एअर फोर्सची सूर्य किरण टीमही आपलं हवाई कौशल्य सादर करणार आहे. 19 नोव्हेंबरला अंतिम सामना सुरु होण्याआधी इंडियन एअर फोर्सची सूर्य किरण एरोबॅटिक टीम 10 मिनिटांचा एअर शो सादर करेल अशी गुजरातच्या डिफेन्स PRO ने माहिती दिलीय. शुक्रवारी आणि शनिवारी या एअर शो चा सराव करण्यात येईल. स्थानिक डान्स ग्रुपही स्टेडियम परिसरात नृत्याचा सराव करत आहेत. टीम इंडिया फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाला भिडणार आहे. टीम इंडियाला 20 वर्षापूर्वीची हिशोब चुकता करण्याची संधी चालून आली आहे. 2003 मध्ये दक्षिण आफ्रिकेत वर्ल्ड कप झाला होता. त्यावेळी रिकी पॉन्टिंगच्या ऑस्ट्रेलियन संघाने फायनलमध्ये टीम इंडियावर विजय मिळवला होता. आता टीम इंडियाकडे त्या पराभवाची परतफेड करुन विश्वचषक उंचावण्याची संधी आहे.हा सामना बघण्यासाठी मोठे उद्योगपती,बॉलिवूड स्टार्स,माजी दिग्गज क्रिकेटपटू,राजकारणी मंडळीसह अनेक मंत्री यॆणार आहेत.त्यामुळे स्टेडियमवर आणि परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे.

Latest Posts

Don't Miss