Sunday, January 12, 2025

Latest Posts

अजित पवार यांना सोबत घेणार का? यावर शरद पवारानंतर जयंत पाटील म्हणालेत…

| TOR News Network |

Jayant Patil Latest News: शरद पवार यांना नुकताच अजित पवार यांना सोबत घेणार का? असा प्रश्न विचारण्यात आला होता. यावर शरद पवारांनी आपल्या पक्षातील महत्त्वाच्या नेत्यांसोबत चर्चा करुन आपण त्याबाबतचे निर्णय घेऊ, असं म्हटलं होतं.(Sharad Pawar On Ajit Pawar Come Back) त्यांनी या प्रश्नावर थेट उत्तर देणे अपेक्षित होतं.(No Clear Answer By Sharad Pawar On Ajit Pawar Come Back) अशात शरद पवार यांच्या या उत्तरानंतर राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं होतं. या दरम्यान जयंत पाटील यांनादेखील अशाचप्रकारचा एक प्रश्न विचारण्यात आला. त्यावर जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. (Jayant Patil On Ajit Pawar Come Back)

वाईट काळात जे सोबत राहिलेले आहेत त्यांना पुन्हा पक्षात घेण्याच्या निर्णयाबाबत शरद पवार यांनी सांगितलेलं आहे.याबाबत जयंत पाटील यांना प्रश्न विचारला असता, “शरद पवार यांना जे सोडून गेलेले आहेत त्यांच्या परतीबद्दल माझ्यात आणि शरद पवार यांच्यामध्ये कुठलीही चर्चा झालेली नाही.(Do Discussion on Come Back Leader with Sharad Pawar) ते परत येतील असं मला वाटत नाही. मात्र आले तर त्याबद्दल चर्चा करू. (If They Comes Will Discuss) मात्र परत येण्यासंदर्भात आमच्याशी कोणीही चर्चा केलेली नाही”, अशी प्रतिक्रिया जयंत पाटील यांनी दिली.(Jayant Patil On Return Of NCP Mla)

अमित शाह यांनी आज ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावरही टीका केली. त्यावरही जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली.(Jayant Patil On Amit Shah) “काहीतरी जुन्या गोष्टी करायच्या आणि काहीतरी चुकीची विधानं करायची. बेरोजगारी, महागाई तसेच शेतमालाला भाव नाही. हे मुख्य प्रश्न बाजूला राहिले आणि हे काय नवीन स्टेटमेंट करत बसले. औरंगजेब सारखेच लोक आहेत. त्यावर जाऊन शतकोनशतके झाली. मात्र तरीही त्यांच्या नावावर राजकारण करून मत मागायची”, असं जयंत पाटील म्हणाले.

 हे सरकार महाराष्ट्रातील जनतेच्या अपेक्षा पूर्ण करू शकलं नाही. पुन्हा आपण निवडून येणार नाहीत, अशी शंका असल्याने पुढच्या पंधरा दिवसात पाहिजे त्या घोषणा ते करतील.(looking at vidhansabha Mahayuti giving only announcement) सत्ताधाऱ्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यामुळे पाहिजे तशा घोषणा त्या पुढच्या काही दिवसांत करतील. महावितरण कंपनीला डुबवून शेतकऱ्यांना वीज बिल माफ संदर्भात कितीही मोठी घोषणा केली तरी त्याचा आता उपयोग होणार नाही”, अशी टीका जयंत पाटील यांनी केली.(Jayant Patil Slams Mahayuti Govt)

“लाडक्या खुर्चीसाठी लाडकी बहीण आणि लाडका भाऊ यांसारख्या योजना आहेत. (Jayant Patil On Ladki bahin And Ladka Bhau yojana) महाराष्ट्रातील जनतेबद्दल कुठलीही आस्था किंवा सहानुभूती महायुतीच्या सरकारला नाहीय. भ्रष्टाचाराचा कळस या सरकारने केलेला आहे. अधिवेशनामध्ये जे आरोप केले त्याला उत्तर सुद्धा सरकारमधले मंत्री देऊ शकलेले नाहीत. त्यामुळे विधानसभा निवडणुकीमध्ये या महायुतीच्या सरकारला पराभूत करण्यासाठी राज्यातली जनता एकत्र येईल असे मला वाटतं”, असा दावा जयंत पाटील यांनी केला.(People Will Defeat Mahayuti Sarkar)

Latest Posts

Don't Miss