Sunday, January 12, 2025

Latest Posts

पुढच्या काळात कोणतीही निवडणूक लढणार नाही – पार्थ पवार

| TOR News Network |

Parth Pawar Latest News : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा बालेकिलला मानल्या जाणाऱ्या पिंपरी चिंचवड मध्ये अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार हे सक्रिय झाले असून ते अॅक्शन मोडवर आले आहेत. (Parth Pawar in Action Mode) ते सध्या कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेत आहेत. पक्ष बांधणी संदर्भात चर्चा ही करताना दिसत आहे. विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने पार्थ हे पिंपरी चिंचवडमध्ये सक्रीय झाले आहेत. (Parth Pawar Active in Pimpri-Chinchwad) यावळी मात्र त्यांनी बोलताना पुढच्या काळात कोणतीही निवडणुक लढणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. (Parth Pawar On Election) संघटना मजबूत करणे आणि पक्षाला पुढे घेवून जाणे हे आपले ध्येय असल्याचेही त्यांनी सांगितले.

काही दिवसांपूर्वी पिंपरी चिंचवड शहरात पूरस्थिती निर्माण झाली होती. त्यावेळी  पूरग्रस्त भागाचा दौरा पार्थ पवार यांनी केला होता. शिवाय पूरस्थितीचा आढावा त्यांनी घेतला होता. (Review of flood by Parth Pawar) त्यानंतर त्यांनी शहरातील पक्ष कार्यकारणीची बैठक घेऊन विविध विषयांवर चर्चा देखील केली होती. पार्थ जाणीव पूर्वक पिंपरी चिंचवडमध्ये लक्ष घालत आहेत. यातून ते पक्षाला उभारणी देण्याचे काम करत आहे. लोकसभेला आपण आणि पक्षाने श्रींरग बारणे यांचे काम मनापासून केला. आता विधानसभेचा काम करायचे आहे त्यानुसार ते कामाला लागले आहेत.

पिंपरी आणि चिंचवड या दोन विधानसभा जागा आहेत. या दोन्ही जागा लढण्यासाठी आम्ही आग्रही आहोत असे त्यांनी स्पष्ट केले आहे. पिंपरी चिंचवड शहरांमध्ये या दोन्ही मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसची मोठी ताकद आहे. पिंपरी आमचा पूर्वीपासूनचा मतदार संघ आहे. तर चिंचवड विधान मतदारसंघा मध्ये आम्हाला पोटनिवडणुकीमध्ये चांगल्या पसंतीचे मते मिळाली होती. त्यामुळे हे दोन्ही मतदार संघ मिळावेत हा आमचा प्रयत्न असेल असे त्यांनी स्पष्ट केले.

एकीकडे पिंपरी चिंचवडमध्ये पार्थ लक्ष घालत असले तरी तिकडे बारामतीच्या हालचालींकडेही त्यांचे लक्ष आहे. युगेंद्र पवार हे शरद पवार गटाकडून बारामतीतून निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत. त्याबाबतही त्यांनी मत व्यक्त केले आहे. युगेंद्र माझ्या पेक्षा मोठा आहे. (Parth Pawar on Yugendra Pawar) त्याला बारामतीतून निवडणूक लढायची आहे. त्याबाबत शरद पवार निर्णय घेतली. त्याला संधी मिळाली तर ते निवडणूक लढतील. तो त्यांचा वैयक्तीक निर्णय आहे. त्यामुळे त्यावर अधिक बोलणे योग्य ठरणार नाही असे त्यांनी सांगितले.

या पुढच्या काळात संघटनेसाठी काम करण्याची इच्छा पार्थ पवार यांनी व्यक्त केली आहे. कोणतीही निवडणूक पुढच्या काळात लढणार नाही असे त्यांनी स्पष्ट केले आहे. खासदार की असो की आमदारकी कोणतीही निवडणूक लढणार नाही असे ते म्हणाले.

Latest Posts

Don't Miss