Saturday, January 11, 2025

Latest Posts

4 जून नंतर त्या वाघाचा आम्ही सत्कार करू : संजय राऊत

| TOR News Network | Sangli Lok Sabha Election : विश्वजित कदम वाघ आहेत की नाही हे 4 जूनला कळेल. (Vishwajeet Kadam sangli news) स्वतःला वाघ सिद्ध करायचे असेल तर चंद्रहार पाटील यांना विजयी केले पाहिजे. 4 जून नंतर त्या वाघाचा आम्ही सत्कार करू असेही खासदार संजय राऊत (Sanjay raut on Vishwajeet kadam) यांनी येथे आज (शुक्रवार) माध्यमांशी बोलताना नमूद केली. 

सांगली लोकसभा मतदारसंघांमध्ये तिरंगी लढत करण्याचे काही जणांचे डावपेच आहेत. विशाल पाटील (Vishal patil sangli) यांना भाजपच रसद पुरवत असल्याचा गंभीर आरोप करत विश्वजीत कदम (Vishwajeet kadam) हे वाघ आहेत की नाहीत हे चार जूनलाच कळेल अशी टिप्पणी खासदार संजय राऊत यांनी येथे आज (शुक्रवार) माध्यमांशी बाेलताना केली. 

खासदार संजय राऊत हे महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रहार पाटील (Chandrahar patil) यांच्या प्रचारासाठी सांगलीत आले आहेत. माध्यमांशी संवाद साधताना राऊत यांनी पंतप्रधान मोदी, प्रकाश आंबेडकर यांच्यावर टीका केली. तसेच राऊत यांचा विश्वजीत कदम यांच्यावर देखील काही प्रमाणात राेष असल्याचे दिसून आले.

खासदार संजय राऊत यांना विश्वजीत कदम यांच्या सांगलीत मी वाघ असल्याच्या वक्तव्यावर प्रश्न विचारला असता त्यांनी सांगलीचा एकमेव वाघ हे वसंतदादा पाटीलच होते असे म्हटलं. वाघ काय असतो बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे, शरद पवार हे आम्ही पाहिले आहेत. वाघाची रचना त्याचा स्वभाव वेगळा असतो.

Latest Posts

Don't Miss