| TOR News Network |
Sharad Pawar Latest News : अजित पवार यांनी दावा केला होता की, विधानसभा निवडणूक 2019 नंतर भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांमध्ये सत्ता स्थापनेसाठी बैठक झाली होता. (Bjp Ncp Meeting for forming govt) त्यावेळी शरद पवार, अमित शाह यांच्यासह दोन्ही पक्षातील बडे नेते या बैठकीत सामील झाले होते. अजित पवारांना या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं होतं. आता यावर शरद पवार यांनी भाष्य केलं आहे. मी देखील त्या बैठकीला होतो हे मान्य केलं आहे.(Sharad Pawar on NCP BJP Meeting 2019)
राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर अजित पवार सातत्याने आरोप करत आहेत की, शरद पवारांना 2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर सत्तास्थापनेसाठी भाजपसोबत चर्चा करण्यास पुढे केलं.(Ajit Pawar On sharad Pawar meeting 2019) सत्तास्थापनेसाठी पाठिंबा दिला आणि ऐनवेळी माघार घेतली. मात्र याबाबत शरद पवारांना कधीही याबाबत स्पष्टपणे काही गोष्टी बोलून दाखवल्या नव्हत्या. मात्र पहिल्यांदाच शरद पवारांनी सत्तास्थापनेबाबत अमित शाह आणि भाजप नेत्यांसोबत बैठक झाल्याचं मान्य केलं आहे.(Sharad Pawar Accepted was in meeting with bjp)
शरद पवार यांनी म्हटलं की, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या पहाटेच्या शपथविधीच्या आधी दिल्लीत ही बैठक झाली होती. पक्षातील अनेक नेत्यांवर ईडीसह इतर तपास यंत्रणांच्या कारवाईची टांगती तलवार होती. त्यामुळे या नेत्यांचा भाजपसोबत जाण्याचा आग्रह होता. (Ed Enquiry on Ncp leader in 2019) मात्र भाजपसोबत जाण्यास माझा विरोध होता. मात्र पक्षातील नेत्यांकडून सातत्याने होणारी मागणी लक्षात घेऊन मी बैठकीला होकार दिला.
भाजप नेत्यांशी बोलून एकदा जाणून घेण्यासाठी आम्ही दिल्लीत बैठक घेतली. या बैठकील अमित शाह देखील उपस्थित होते, असं शरद पवार यांनी एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं.
सत्तास्थापनेबाबत भाजपसोबत बैठक झाली होता. केंद्रीय तपास यंत्रणाचा दबाव भाजपसोबत गेल्यास कमी होईल, असं पक्षातील नेत्यांचं म्हणणं होतं. भाजपच्या नेत्यांकडूनच याबाबत ऐकून घ्यावं, असं पक्षातील नेत्यांना सांगितलं. त्यामुळे दिल्लीत भाजप नेते आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये बैठक पार पडली होती, असं शरद पवारांनी म्हटलं.
भाजप आणि शिवसेनेनंतर सर्वात मोठा पक्ष म्हणून सत्तास्थापनेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसला विचारण्यात आले.(Devendra Fadnavis on Ncp ) मात्र त्यांना देखील सत्तास्थापनेचा दावा करायचा नव्हता. तसं पत्र माझ्याच कार्यलयात टाईप झाल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं. त्यानंतर राज्यात राष्ट्रपती राजवट लागल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं.
दिल्लीत भाजप आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांची सत्तास्थापनेसाठी बैठक झाल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी देखील मान्य केलं आहे. सरकार स्थापन करण्यासाठी आपण एकत्र येणार आहोत, असं शरद पवारांनी ठरवले होते. राज्यात 10 नोव्हेंबरपर्यंत सरकार स्थापन झाले नाही तर राष्ट्रपती राजवट लागू होणार होती. भाजपविरोधात लढलो तरी स्थिर सरकार देण्यासाठी राष्ट्रवादी आणि भाजपने मिळून एकत्र सरकार स्थापन करण्याचे ठरले, असं शरद पवार जाहीर करणार होते.