Saturday, January 11, 2025

Latest Posts

वायकरांना आर्टिकल 99 नुसार खासदारकीची शपथ देता येणार नाही 

| TOR News Network |

Ravindra Waiker Latest News : शिवसेना शिंदे गटाचे नवनिर्वाचीत खासदार रविंद्र वायकर यांच्या अडचणी वाढताना दिसत आहे. (Ravindra Waiker in trouble) त्यांचा विजय हा शंकेच्या गर्तेत अडकलेला आहे. त्यांच्या विजयावर आता हिंदू समाज पार्टीचे उमेदवार भरत शाह यांनी आक्षेप घेतला आहे.(Hindu Samaj Party took Objection on waiker win) त्यांनी थेट लोकसभा सचिव उत्पलकुमार सिंग यांना नोटीस पाठवून वायकर यांना खासदारकीची शपथ देवू नये असे सांगितले आहे. (Complaint to Lok sabha Secretary Utpal Kumar) उत्तर पश्चिम लोकसभेतील मतमोजणी ही पारदर्शक पणे झालेली नाही. त्यांचा विजय हा वादातील आहे. (Ravindra waiker win in trouble) त्यामुळे त्यांना खासदारकीची शपथ देवू नये अशी मागणी त्यांनी केली आहे. (Shivsena Mp Waiker Oath in Trouble)

ईव्हीएम मशिन मतमोजणी बाबत देशात पहिल्यांदाच एफआयआर दाखल झाला आहे. त्यामुळे वायकर यांना आर्टिकल 99 नुसार खासदारकीची शपथ देता येणार नाही असे या नोटीसमध्ये म्हटले आहे. (As per Article 99 waiker can’t take oath as mp) तसे झाले तर संविधानाला अपवित्र करण्याचा तो प्रकार होईल असेही ते म्हणाले. या नोटीसमध्ये असाही उल्लेख आहे की अशी मागणी यापूर्वी कुणी केली नसेल. पण संविधानाचा उद्देश लक्षात घेता ही मागणी करत असल्याचे त्यात म्हटले आहे. वायकर यांचा विजय संशयाच्या गर्तेत आहे. अशा वेळी त्यांना खासदारकीची शपथ देणे योग्य ठरणार नाही असेही म्हटले आहे.

मुंबई उत्तर-पश्चिम मतदारसंघातली मतमोजणी नेस्को सेंटर इथे झाली. या मतमोजणी केंद्रावरील सीसीटीव्ही फुटेजची मागणी करण्यात आली. मात्र ते देण्यात आले नाही. या सर्व गोष्टी दबावातून होत आहेत असा आरोपही करण्यात आला आहे. याबाबत आपण उच्च न्यायालयातही धाव घेणार असल्याचे शाह यांनी स्पष्ट केले आहे.

Latest Posts

Don't Miss