Sunday, January 12, 2025

Latest Posts

कोहली नव्या विराट विक्रमाच्या उंबरठ्यावर

Virat Kohli New Record News : नुकताच भारत आणि अफगाणिस्तान या दोन्ही संघांमध्ये ३ टी-२० सामन्यांची मालिका पार पडली. या मालिकेत भारतीय संघाने ३-० ने विजय मिळवत अफगाणिस्तानचा सुपडा साफ केला. आता भारतीय संघ पुढील आव्हानासाठी सज्ज झाला आहे.

भारत आणि अफगाणिस्तान या दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेला प्रारंभ होणार आहे. मालिकेतील पहिला कसोटी सामना २५ जानेवारीपासून हैदराबादमध्ये रंगणार आहे. दरम्यान या सामन्यात विराट कोहलीला मोठा रेकॉर्ड आपल्या नावावर करण्याची संधी असणार आहे.

पहिल्या कसोटी सामन्यात विराटने जर १५२ धावा केल्या.(Virat Test Record) तर तो कसोटी क्रिकेटमध्ये ९ हजार धावा करणारा चौथा फलंदाज ठरणार आहे.(Virat Kohli Test Runs) असा कारनामा करणारा तो चौथा भारतीय फलंदाज ठरणार आहे. (Virat Kohli Runs Record) वर्तमान क्रिकेटमध्ये केवळ स्टीव्ह स्मिथ आणि जो रुट यांना ९ हजार धावा करता आल्या आहेत.

इंग्लंडविरुद्ध रचणार इतिहास

कसोटी क्रिकेटमध्ये हा मोठा रेकॉर्ड मोडण्यासाठी विराटला केवळ १५२ धावांची गरज आहे.(Virat Kohli Latest Record News) यापूर्वी सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड आणि सुनील गावस्कर यांना हा कारनामा करण्यात आला आहे. (Virat Kohli On New Test Record)आता विराट कोहली असा कारनामा करणारा चौथा फलंदाज ठरणार आहे. विराटने आतापर्यंत ८८४८ धावा केल्या आहेत. तसेच कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा रेकॉर्ड हा सचिन तेंडुलकरच्या नावे आहे. सचिनने कसोटी कारकिर्दीत १५९२१ धावा केल्या आहेत.

कसोटीत सर्वाधिक धावा करणारे भारतीय फलंदाज

  1. सचिन तेंडुलकर -१५,९२१ धावा
  2. राहुल द्रविड – १३,२८८ धावा
  3. सुनील गावसकर – १०,१२२ धावा
  4. विराट कोहली – ८,८४८ धावा

कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारे फलंदाज

  1. जो रूट (इंग्लंड) – ११,४१६ धावा

२. स्टीव्ह स्मिथ (ऑस्ट्रेलिया) – ९५२७ धावा

  1. विराट कोहली (भारत) -८,८४८ धावा
  2. केन विलियम्सन (न्यूजीलंड) -८,२६३ धावा

Latest Posts

Don't Miss