Saturday, January 18, 2025

Latest Posts

पुरोगामी महाराष्ट्रात नवीन साडी घोटाळा

विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचा सरकारवर आरोप

| TOR News Network | Vijay Wadettiwar Statement On Saree Tender : महिलांना साडी देण्याचं टेंडर सरकारने काढलं आहे. साडी घोटाळा सरकार करत आहे असा आरोप विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर केला आहे. 1 कोटी साडी वाटप करून सरकार मतं घेण्याचा प्रयत्न करतंय असा थेट आरोप वडेट्टीवारांनी केला आहे. (Vijay Wadettiwar On Saree Tender in Maharashtra) तसेच, 1 लाख 14 हजार मोबाईल खरेदीसाठी 155 कोटींची तरतूद (155 Crore For Mobile Purchasing) केल्याचा आरोप देखील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी पत्रकार परिषदेत केला आहे. (Vijay Wadettiwar on Maha Govt)

महिलांना साडी देण्याचं टेंडर

1 कोटी साडी वाटप करून सरकार मतं घेण्याचा प्रयत्न करतंय असा थेट आरोप वडेट्टीवारांनी केला आहे. (Maha Gov Giving 1 Crore saree )ज्यांनी आता महिलांना साडी देण्याचं टेंडर काढलं आहे. आता महिलांना साडीची भेट देऊन निवडणुकीच्या तोंडावर मतं मिळवण्याचा महाराष्ट्रातल्या पुरोगामी महाराष्ट्रात नवीन साडी घोटाळा या राज्यामध्ये आता सुरु झाला आहे. (Saree Scam in Maharashtra)असा आरोपही त्यांनी केला आहे.

ते 3 मंत्री पैशांशिवाय काम करत नाही

सरकारवर साडी नेसून मिरवण्याची पाळी

सरकारवर साडी नेसून मिरवण्याची आणि पदर झाकून मिरवण्याची पाळी आली आहे. डोक्यावर तोंड झाकून साडीचा पदर तोंडावरून झाकून फिरण्याची वेळ आल्यामुळे महिलांना साडी भेट देऊन मतं मिळविण्याचा केविलवाणा प्रयत्न हे सरकार आता करतंय. यावरून साडी घोटाळा आता प्रकाशात आलेला आहे. असं वडेट्टीवार म्हणाले. दिवसेंदिवस घोटाळे सरकारचे समोर येत आहेत.(Many Scam in Maharashtra ) सरकारने क्लृप्त्या लढवणे आणि घोटाळे करणे सुरु केलं आहे.

मंत्रालयात गुंड नीलेश घायवाळ

मंत्रालयात गुंड नीलेश घायवाळ रील तयार करतो. त्याच्याबरोबरं त्याचे इतर गुंड देखील आहेत. हा कशी काय एवढी हिंमत करतो? मुख्यमंत्र्याना भेटायला जातो हे कसं काय शक्य होतंय? गुंडांना बरोबर घ्यायची वेळ मुख्यमंत्र्यांना घ्यावी लागते? अशी देखील टीका त्यांनी केली आहे. (Criminal With Cm Eknath Shinde)

मुख्यमंत्री म्हणाले आपल्या जवळ फक्त 60 दिवस शिल्लक

अंब्युलन्स घोटाळा समोर आणला

अंब्युलन्स घोटाळा मी समोर आणला होता आता अंगणवाडी सेविकांचा विषय मांडत आहे. मर्जीतील कंपनीला यांनी मोबाईल खरेदी करण्यासाठी कंत्राट दिलं आहे.(Mobile Purchasing Tender in Maharashtra) कोट्यावधी रुपयांचं काम आहे. दिल्लीची कंपनी आहे ही. ही कुणाच्या जवळची आहे हे लक्षात घ्यायला हवं. त्या कंपनीला पैसे देण्यापेक्षा अंगणवाडी सेविकांना पैसै का दिले नाहीत? यांना कमीशन आणि वसुली यासाठी त्यांनी हा घोटाळा केला आहे.

Latest Posts

Don't Miss