Saturday, January 11, 2025

Latest Posts

शिवतारेंचं फायनल ठरलं.. मी बारामतीतूनच लढणार

| TOR News Network | Vijay Shivtare Lok Sabha News : बारामती लोकसभा मतदारसंघात नणंद विरूद्ध भावजय अशा होत असलेल्या या लढतीमध्ये आता एक नवा ट्वि्स्ट आला आहे. अजित पवार यांचे कट्टर राजकीय विरोधक, शिवसेना शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे यांनी बारामतीतून आपण निवडणूक लढणार असल्याची घोषणा केली आहे. शिवसेना नेते आणि माजी मंत्री विजय शिवतारे हे बारामतीतून अजित पवारांना आव्हान देण्यासाठी अद्यापही ठाम आहेत. (Shivtare is still determined to challenge Ajit Pawar from Baramati.) त्यातच आज त्यांनी आणखी एक प्रस्ताव मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर ठेवला आहे. आपण भाजपचा उमेदवार म्हणून बारामतीतून निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. (Vijay Shivtare ready to fight even on BJP lotus)

शिवतारे काय म्हणाले?

विजय शिवतारे शिवसेनेतून बाहेर पडणार का?, त्यावर विजय शिवतारे यांनी मोठं विधान केलं आहे. माझा एकनाथ शिंदे यांचं घनिष्ठ नातं आहे. दोन चार महिने त्यांची अडचण झाली आहे. मला तर लोकसभा निवडणूक लढायचीच आहे. महायुतीत आपल्याला जागा तर सुटणार नाही. त्यांना अडचण आहे म्हणून मी बाहेर पडतोय… 25 वर्षाची सोबत आहे ती असणार आहे ना… मी लोकसभेत विजयी होणार हे दैदिप्यमान यश असेल, असं विजय शिवतारे म्हणाले.(i will win from baramati)

लोकांना दोन्ही पवार नकोत

बारामतीतील लढाई ही सुप्रिया सुळे विरुद्ध विजय शिवतारे होईल. महायुतीत एका पवाराला घ्यायचं आणि दुसऱ्या पवाराला पडायचं… पण लोकांना दोन्ही पण पवार नको आहेत.(people dont want both pawar) जनतेची ही मागणी आहे. म्हणून मी निवडणूक लढवतोय. ही लढाई पवार कुटुंब विरुद्ध जनता आहे. पवारांनी पुरंदरचं विमानतळ बारामतीला नेण्याचा प्रयत्न केला. आता जनता या सगळ्याला उत्तर देईल. लोक आता या सगळ्याला उत्तर देतील, असं शिवसातारेंनी म्हटलं.

Latest Posts

Don't Miss