Monday, November 18, 2024

Latest Posts

विधानसभा अपडेट : ऑक्टोबर मध्ये आचारसंहिता तर नोव्हेंबरमध्ये मतदान

| TOR News Network |

VidhanSabha Election 2024 Latest News : राज्यात सर्व राजकीय पक्ष विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागले आहे. पण निवडणूका कधी होणार, आचारसंहिता कधी लागणार असेही प्रश्न  कायम आहेत. अशातच राज्यातील विधानसभा निवडणुका दिवाळीनंतरच होणार असल्याची माहिती  समोर आली  आहे.(Vidhansabha Election After Diwali) ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात निवडणूक आचारसंहिता लागू शकते. (Maharashtra Assembly Election 2024)  तर नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात मतदान होणार  असल्याची खात्री लायक माहिती सूत्रांकडून सांगण्यात आली आहे.

राज्यातील निवडणुका दिवाळीनंतर होणार असल्या तरी राजकीय पक्षांनी विधानसभेसाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. राज्यभरात राजकीय पक्षांच्या सभा, दौरे, बैठका होऊ लागल्या आहेत. तरीही नव्या विधानसभेसाठीआणखी काही काळ वाट पाहावी लागणार आहे. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता ऑक्टोबरमध्ये लागणार (code of conduct for vidhansabha in Octomber ) व  नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात मतदान आणि त्यानंतर तिसऱ्या किंवा चौथ्या आठवड्यात मतमोजणी होण्याची शक्यता आहे असे एका वृत्तवाहिनीने यासंदर्भात वृत्त दिले आहे. (Vidhansabha voting in November next week)

लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुती आणि महाविकास आघाडीतील संघर्ष संपूर्ण राज्याने पाहिला. महाविकास आघाडीला राज्यात चांगले यश मिळाले.(big success for mahavikas aghadi in loksabha) तर महायुतीला मात्र अपेक्षित यश मिळवता आले नाही. त्यामुळे महाविकास आघाडीचा आत्मविश्वासही दुणावला आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत समीकरणेही बदलणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे विधासभा निवडणुकीतही लोकसभेची पुनरावृत्ती होणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

दुसरीकडे, आगामी निवडणुकीसाठी मनसे आणि वंचित बहुजन आघाडीने स्वबळावर लढण्याची भूमिका घेतली आहे.(MNS to contest independent in vidhansabha) राज ठाकरेंचा महाराष्ट्र दौराही सुरू झाला आहे. एकापाठोपाठ सभा, बैठका होऊ लागल्या  आहेत.  नोव्हेंबर महिन्याच्या सुरूवातीला दिवाळी असल्याने दुसऱ्या आठवड्यात मतदान प्रकिया आणि तिसऱ्या किंवा चौख्या आठवड्यात म्हणजे साधार १५  ते २० नोव्हेंबरच्या आसपास निवडणुकीचा निकाल जाहीर होऊ शकतो. असेही काही तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

Latest Posts

Don't Miss