शिवसेना ठाकरे गटप्रमुख उद्धव ठाकरे संतापले
| TOR News Network | Uddhav Thackeray Press Brief Today : राज्यात सुरु असलेल्या कायदा व सुव्यवस्थेवर शिवसेना ठाकरे गटप्रमुख उद्धव ठाकरे चांगलेच संतापले. राज्यात वाढत असलेल्या गुन्हेगारी बद्दल सरकारला धारेवर धरले. दोन दिवसांपूर्वी ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची गोळ्या झाडून निर्घृण हत्या करण्यात आली. यावर उद्धव ठाकरे यांनी शनिवारी पत्रकार परिषद घेत सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.(Uddhav Thackeray Slams Maharashtra Govt)
उद्धव ठाकरे म्हणालेत…
“गेले काही दिवस महाराष्ट्रामध्ये उद्विग्न अस्वस्थता आहे. डोळ्यासमोर जी काही बेबंधशाही सुरू आहे. महाराष्ट्र काय आहे हे माहीत नसलेले निर्ढावलेले पणे बोलत आहेत. पण महाराष्ट्रातील लोकांची मन दुखावली आहेत, गुंडांचा हैदोस महाराष्ट्रामध्ये सुरू आहे.(Crime Rate Rais In Maharashtra) सरकारमध्ये गँगवार सुरू आहे,” अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली. (Gangwar In Maharashtra Sarkar)
उद्धव ठाकरेंचा नवा नारा… भाजपमुक्त जय श्रीराम
दोघांची सुपारी कोणी दिली
“अभिषेक घोसाळकरची हत्या झाली. त्यानंतर या गुंडाने स्वतः आत्महत्या का केली? फेसबुक लाईव्हमध्ये गोळ्या घातल्या, पण गोळ्या कोण घालतंय हे त्यात दिसत नाही. बॉडिगार्डच्या बंदुकीने त्याने गोळ्या घातल्या असं सांगितलं जातंय, पण त्या मॉरिस ला बॉडीगार्ड का ठेवावा लागला? त्या दोघांची सुपारी कोणी दिली होती का?” असा गंभीर सवाल उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला. (Uddhav Thackeray on Abhishek Ghosalkar)
राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करा
गाडीखाली श्वान आला तरी राजीनामा मागतील असंच बोलले ना. श्वान हा संस्कृत शब्द बोलल्याने सुसंस्कृत होत नाही. निर्ढावलेला, निष्ठूरआणि निर्दयी गृहमंत्री आहे. आम्ही राज्यपालांकडे जाणार नाही. आम्ही आपल्या माध्यमातून मागणी करतो राज्य बरखास्त करा, राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करा आणि लवकर निवडणुका लावा, अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी हल्लाबोल केला.(Implement President’s rule in the state)