Saturday, January 11, 2025

Latest Posts

काँग्रेसचे दोन आमदार शिंदे गटाच्या वाटेवर ?

| TOR News Network |

Congress Mla Latest News : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात मोठ्या प्रमाणात राजकीय हालचाली सुरु आहेत. अशातच आता काँग्रेसचे दोन आमदार शिंदे गटाच्या वाटेवर असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. (Two Mla to Left Congress) काँग्रेसचे हिरामण खोसकर आणि जितेश अंतापूरकर यांनी एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी भेट घेतली आहे. (Hiraman Khoskar and Jitesh Antapurkar meet Cm Shinde) त्यानंतर हे दोनही आमदार काँग्रेसला सोडचिठ्ठी देणार असल्याच बोलले जात आहे.

गेल्या महिन्यात झालेल्या विधानपरिषदेच्या निवडणुकीत महायुतीचे सर्व नऊ आमदार विजय झाले होते. या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या आमदारांनी क्रॉस वोटिंग केल्याची चर्चाही जोर धरू लागली होती. यात काँग्रेसचे दोन आमदार हिरामण खोसकर आणि जितेश अंतापूरकर यांची नावे प्रामुख्याने पुढे होती.(Congress 2 mla done cross voting ) त्यानंतर त्यांच्यावर कारवाई होणार असल्याचेही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्पष्ट केले होते.

त्यानंतर काही दिवसांनी, हिरामण खोसकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली होती. तर जितेश अंतापूरकर यांनीदेखील नांदेडमध्ये भाजप खासदार अशोक चव्हाण यांची भेट घेतली होती. तेव्हापासूनच खोसकर आणि अंतापूरकर हे दोन्हीही आमदार महायुतीच्या वाटेवर असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होत्या. (Two Congress to Join Mahayuti) त्यानंतर आज पुन्हा एकदा हिरामण खोसकर आणि जितेश अंतापूरकर शिंदे गटाच्या वाटेवर असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

दरम्यान विधानपरिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसची काही मते फोडून महायुतीने आपल्या सर्व 9 उमेदवारांना विजयी केले. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडे कमी मतं असतानाही त्यांचेही दोनही उमेदवार विजयी झाले. पण शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने पाठिंबा दिलेले शेतकरी कामगार पक्षाचे जंयत पाटील यांना मात्र पराभव स्वीकारावा लागला. या निवडणुकीत काँग्रेसची सात मते फुटल्याचा आरोप झाला आणि काँग्रेसची मते फुटल्याचेही उघडकीस आले. खासदार अशोक चव्हाण यांनी ही मते फोडल्याच्याही चर्चा सुरू झाल्या. अखेर नाना पटोले यांनी  क्रॉस वोटिंह करणाऱ्या आमदारांवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले. पण आता खोसकर आणि अंतापूकर शिंदे गटाच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे.

Latest Posts

Don't Miss