Saturday, January 18, 2025

Latest Posts

भूकंपाच्या तीव्र धक्क्यानंतर जपानमध्ये आता त्सुनामीचा धोका

Tsunami In Japan News : सोमवारी, १ जानेवारीला जपानमध्ये ९० मिनिटांत रिश्टर स्केलवर ४.० किंवा त्याहून अधिक तीव्रतेचे भूकंप जाणवले. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ७.६ इतकी मोजली गेली. समुद्रात उंच लाटा उसळल्यानंतर देशाच्या उत्तर-पश्चिम किनारपट्टी भागात त्सुनामीचा इशारा देण्यात आला असून येथून लोकांना हलवण्यात येत आहे. जपानच्या हवामान खात्याने इशिकावा प्रांतातील नोटो शहरात मोठ्या सुनामीचा इशारा दिला आहे, ज्यामध्ये सुमारे ५ मीटर उंच लाटा येण्याची शक्यता आहे.

भूकंपाच्या मालिकेनंतर ३४,००० घरांचा वीजपुरवठा बंद करण्यात आला आहे. मध्य जपानमधील अनेक प्रमुख महामार्ग बंद करावे लागले कारण भूकंपामुळे रस्त्यांना मोठ्या भेगा पडल्या. फुकुई प्रीफेक्चर (फुकुई प्रीफेक्चर हा जपानच्या होन्शु बेटाचा भाग आहे) येथील अग्निशमन विभाग आणि स्थानिक सरकारच्या म्हणण्यानुसार, किमान ५ लोक जखमी देखील झाले आहेत. सर्वांना किरकोळ दुखापत झाली आहे. रशियन न्यूज एजन्सी ताशने दिलेल्या माहितीनुसार, जपानच्या जवळ असलेल्या देशाच्या पश्चिम किनार्‍यावरील काही भागांना त्सुनामीचा धोका असून स्थानिक लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात येत आहे.

भारतीय दूतावासाने जारी केले संपर्क क्रमांक

दक्षिण कोरियाच्या हवामानशास्त्र संस्थेने सोमवारी सांगितले की, जपानच्या भूकंपानंतर पूर्व किनारपट्टीवरील गँगवॉन प्रांतातील काही भागांमध्ये समुद्राची पातळी वाढू शकते. NHK वर प्रसारित केलेल्या व्हिडिओ संदेशात, जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा म्हणाले की, अधिकारी भूकंपामुळे झालेल्या नुकसानीचे मूल्यांकन करत आहेत. भूकंपाच्या संभाव्य धक्क्यांसाठी नागरिकांनी तयार राहणे आवश्यक आहे. पीएम किशिदा म्हणाले, ‘ज्या भागात त्सुनामी येण्याची शक्यता आहे त्या भागातील लोकांना मी लवकरात लवकर त्या भागातून बाहेर जाण्याचे आवाहन करतो.’ जपानमधील भारतीय दूतावासाने आपल्या नागरिकांसाठी आपत्कालीन नियंत्रण कक्ष स्थापन केला आहे. कोणत्याही मदतीसाठी, भारतीय नागरिक खालील आपत्कालीन क्रमांक आणि ईमेल आयडीवर संपर्क साधू शकतात.

जपानने इशिकावा प्रीफेक्चरसाठी हायस्पीड रेल्वे सेवा निलंबित केली आहे. दूरसंचार ऑपरेटर्सनी इशिकावा आणि निगाता येथे फोन आणि इंटरनेट सेवा खंडित झाल्याची नोंद केली आहे. जपानच्या राज्य वृत्तसंस्था NHK ने प्रसारित केलेल्या फुटेजमध्ये सुझू या किनारपट्टीच्या शहरामध्ये धुळीच्या ढगांमध्ये एक इमारत कोसळताना दिसली. कानाझावा शहरातील रहिवासी टेबलाखाली लपलेले दिसले. राजधानी टोकियोमधील इमारतींनाही भूकंपाचा धक्का बसला. जपानी एअरलाइन एएनएने भूकंपानंतर टोयामा आणि इशिकावा विमानतळाकडे जाणारी चार विमाने परत वळवली. जपान एअरलाइन्सने पुढील सूचना मिळेपर्यंत निगाटा आणि इशिकावा भागातील बहुतेक उड्डाणे रद्द केली आहेत.

Latest Posts

Don't Miss