Saturday, January 18, 2025

Latest Posts

बारामतीत लोकसभेसाठी पवार कुटुंबातील दोन महिला आमने सामने

| TOR News Network | Baramati Loksabha News : हाऊ घातलेल्या लोकसभेच्या निवडणूकांसाठी सर्व पक्ष कामाला लागले आहेत. अध्याप कोणत्याही पक्षाने कोणला उमेदवारी दिल्या जाईल हे जाहीर केली नसले तरी संभाव्य उमेदवारांनी मोर्चा बांधणीला सुरुवात केली आहे. शरद पवार यांचा बालेकिल्ला असलेल्या बारामतीतून शरद पवार आणि अजित पवार गटाकडून कोणाला उमेदवारी दिला जाते याकडे सर्वांचे लक्ष लागले असताना पवार कुटुंबातील दोन महिला आमने सामने असण्याचे संकेत दिसून येत आहे. (Two Women From Pawar family in Loksabha)

लोकसभेसाठी उमेदवारी जाहीर झालेली नसली तरी काही ठिकाणी उमेदवार निश्चित झाले आहेत. त्यानुसार प्रचार सुरु झाला आहे. संपूर्ण राज्याचे नव्हे तर देशाचे लक्ष लागलेल्या बारामती मतदार संघातील लढत चांगलीच रंगणार आहे. (Baramati Loksabha News ) कारण बारामतीमध्ये पवार कुटुंबियांमध्येच लढत होणार आहे. राष्ट्रवादीतील शरद पवार गटातील उमेदवार सुप्रिया सुळे पुन्हा लढणार आहे. (Supriya Sule From Baramati Loksabha) तसेच महायुतीकडून अजित पवार गटास ही जागा मिळणार आहे. महायुतीकडून अजित पवार गटाकडून कोण असणार? हे निश्चित झाल्याचे संकेत मिळत आहे. बारामतीमधून अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांची उमेदवारी जवळपास निश्चित झाली आहे. (Sunetra Pawar From Baramati Loksabha)

लोकसभेसाठी हे दोन कट्टर विरोधक आमने सामने

बारामती लोकसभा मतदार संघात सुनेत्रा अजित पवार यांची उमेदवारी जवळपास निश्चित झाल्याचे संकेत मिळत आहे. (Sunetra Ajit Pawar in loksabha 2024) बारामतीमध्ये केवळ अधिकृत घोषणा बाकी आहे. बारामती परिसरात सुनेत्रा पवार यांच्या माहिती व कार्याचा आढावा घेणारा प्रचार रथ लागला फिरू लागला आहे. त्यासाठी गाडीवर फ्लॅक्स लावले आहे. त्यात सुनेत्रा पवार यांचा मोठा फोटो घेतला आहे. तसेच अजित पवार यांचाही फोटो आहे.

Latest Posts

Don't Miss