Monday, November 18, 2024

Latest Posts

तुरुंगात टाकण्याची धमकी देणाऱ्यांनी पहिले न्यायालयाच्या निरीक्षणाचा अभ्यास करावा – सलील देशमुख

| TOR News Network |

Salil Deshmukh Latest News : तीन वर्षापुर्वी खोटया आरोपात अनिल देशमुख यांना अटक करण्यात आली होती. परंतु मा.न्यायालयाने त्यांना जामीन देताना जे निरीक्षण नोंदविले आहे ते महत्वाचे आहे. (Salil Deshmukh On Hon’ble Court observation)  मा. न्यायालयाने जो जामीन दिला आहे तो मेडीकल ग्राउंडवर नाही तर या प्रकरणा विश्वासार्हता नसल्याच्या मेरीटवर दिला आहे. अनेक जण आता यावर भाष्य करुन जनतेची दिशाभूल करण्याचे काम करत आहेत. जे लोक जामीन रद्द करुन तुरुंगात टाकण्याची धमकी देत आहे त्यांनी आधी  मा. न्यायालयाने जामीन देताना जे निरीक्षण नोंदविले आहे त्याचा अभ्यास करावा.(Salil Deshmukh On Granting Bail.) त्यांच्या अशा पोकळ धमक्यांना आम्ही घाबरत नाही असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे जि.प.सदस्य सलील देशमुख यांनी आज (सोमवारी ता.२९) दिला आहे. (Salil Deshmukh Slams BJP )

पुढे बोलतांना सलील देशमुख म्हणाले की, मा. न्यायालयाने जामीन देतांना जे निरीक्षण नोंदविले आहेत ते महत्वाचे आहे. यात प्रामुख्याने न्यायालयाने म्हटल्यानुसार – अनिल देशमुख यांच्या विरोधात कोणतेही पुरावे नाहीत. (There is no evidence against Anil Deshmukh) न्यायालयाने म्हटल्यानुसार – अनिल देशमुख यांच्यावर एैकीव माहितीवर आरोप करण्यात आले आहे. न्यायालयाने म्हटल्यानुसार – सर्व कागदपत्रे व बयान एैकल्यावर असे दिसते की, भविष्यात अनिल देशमुख या प्रकरणात दोषी ठरु शकणार नाही. तसेच दोन वर्षापुर्वी न्यायमुर्ती चांदीवाल यांनी अनिल देशमुख यांना “क्लिन चिट” दिली आहे.(Justice Chandiwal has given a clean chit to Anil Deshmukh)

असे असतानाही भाजपाचे नेते मंडळी अनिल देशमुख यांना परत तुरुंगात पाठविण्याच्या धमक्या देत आहेत. ज्या व्यक्तीने खोटे आरोप करण्यासाठी नकार देवून जेल मध्ये जाने मान्य केले. परंतु भाजपाच्या कटकारस्थानाचे ते भाग बनले नाही, त्यांना तुम्ही जेलमध्ये जाण्याच्या धमक्या देता. आमच्या परिवारावर 130 रेड झाल्यात, (Salil Deshmukh On 130 Raid Over Family) माझ्या सहा वर्षाच्या मुलीची चौकशी करुन तिला त्रास देण्यात आला.(Salil Deshmukh On 6 year daughter Inquiry) संपूर्ण परिवाराला अडचणीत आणण्याचे काम केले. अशातही अनिल देशमुख हे झुकले नाहीत असेही सलील देशमुख यावेळी म्हणाले.(Salil Deshmukh On Anil Deshmukh) पत्रकार परिषदेला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे शहर अध्यक्ष दुनेश्वर पेठे, महाराष्ट्र राज्य राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्य अध्यक्ष शैलेन्द्र तिवारी,नतन रेवतकर आदी उपस्थित होते.

Latest Posts

Don't Miss