Saturday, November 16, 2024

Latest Posts

भाजपामध्ये ज्या नावाची चर्चा होते ते कधी मुख्यमंत्री होत नाहीत

| TOR News Network |

Vinod Tawade Latest News : महाविकास आघाडी आणि महायुती असा थेट संघर्ष महाराष्ट्रात होत आहे. या दोन्ही गटांमधील मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण असेल याबद्दल कोणतीही जाहीर घोषणा करण्यात आलेली नाही.(No Cm Face declader from yuti and aghadi) अर्थात या मुद्द्यावरुन दोन्ही बाजूंनी एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला जातो. मात्र आता मुख्यमंत्रिपदासंदर्भात भाजपाचे राष्ट्रीय सचिव विनोद तावडे यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेल्या पत्रकारपरिषदेत सूचक विधान केलं आहे. (Vinod Tawade on State cm face)

महाराष्ट्रातून सध्या भावी मुख्यमंत्री म्हणून अनेक नेत्यांची नावं चर्चेत आहेत. महायुतीमधील तिन्ही घटक पक्षांचे तिन्ही महत्त्वाचे नेते या शर्यतीत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहेत. यामध्ये विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंबरोबरच विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या नावाचा समावेश आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीकडून ठाकरेंच्या गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी अनेकदा त्यांच्या पक्षाकडून मुख्यमंत्रिपदाचे प्रमुख दावेदार उद्धव ठाकरेच असल्याचं म्हटलं आहे.(Sanjay Raut on cm face) काँग्रेसने आधी जिंकून सत्ता मिळवू मग मुख्यमंत्री ठरवू अशी भूमिका घेतली आहे. असं असलं तरी काँग्रेसमधील नाना पटोले, बाळासाहेब थोरात यासारख्या नेत्यांच्या कार्यकर्त्यांनी वेळोवेळी भावी मुख्यमंत्री असे आपल्या लाडक्या नेत्यांचे पोस्टर्स झळकवल्याचं पाहायला मिळालं आहे. शरद पवारांच्या पक्षाने शरद पवार ठरवतील त्या व्यक्तीला आमचा पक्ष म्हणून पाठिंबा असेल असं जाहीर केलं आहे.

छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेल्या पत्रकारपरिषदेत विनोद तावडेंना पत्रकारांनी, ‘2024 च्या निवडणुकींचे निकाल आणि भाजपाचा मुख्यमंत्री असं काही?’ असा प्रश्न विचारला. त्यावर तावडेंनी, ‘महायुती जिंकेल आणि महायुतीचा मुख्यमंत्री होईल,’ असं उत्तर दिलं. त्यानंतर पत्रकारांनी, ‘तुमच्या नावाची चर्चा पण भरपूर होतेय,’ असं म्हणत विनोद तावडेंची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला. हे वाक्य ऐकताच तावडेंनी, “भाजपामध्ये ज्या नावाची चर्चा होते ते कधी (मुख्यमंत्री) होत नाहीत हे पक्क लक्षात ठेवा. (Tawade on cm face of state) काही काळजीच करु नका,” असं म्हटलं. तावडे एवढ्यावरच थांबले नाही तर त्यांनी भाजपाने नुकत्याच जिंकलेल्या तीन राज्यांचं उदाहरणंही दिली. “तुम्हाला राजस्थानचे भजनलाल माहिती होते? मोहन यादव (मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री) माहिती होते? ओडिसाचे मुख्यमंत्री माहिती होते?” असा प्रश्न तावडेंनी पत्रकारांनी विचारला. त्यानंतर हसतच तावडे, “त्यामुळे माझ्या नावाची चर्चा झाली ना, तर मी नक्की नाही हे ठरवा. बाकी बघू,” असं म्हणत पुढल्या प्रश्नाकडे वळले.

Latest Posts

Don't Miss