Thursday, January 16, 2025

Latest Posts

अमरावती, वर्ध्यासह काही ठिकाणी ईव्हीएममध्ये तांत्रिक बिघाड

| TOR News Network | 2nd Phase Lok Sabha Voting : लोकसभेच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदानाला आज सकाळ पासून सुरुवात झाली. (second phase voting started) यात अनेक ठिकाणी मतदान केंद्रावर मोठ्या रांगा दिसून आल्यात.मात्र काही ठिकाणी ईव्हीएममध्ये तांत्रिक बिघाड आल्यामुळे मतदारांना मनस्ताप सहन करावा लागला. (Evm Fault in many places at vidarbha)

महाराष्ट्र राज्यातील ८ लोकसभा मतदारसंघात आज दुसऱ्या टप्प्यातील मतदान पार होत आहे. सकाळी ७ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली. सकाळच्या सुमारास मतदान करण्यासाठी नागरिकांनी मतदान केंद्राबाहेर मोठी गर्दी केली.मतदानावेळी कोणताही अनूचित प्रकार घडू नये म्हणून मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. (Big police force deployed at voting center) दरम्यान, मतदानाला सुरुवात झाल्यानंतर काही वेळात अनेक ठिकाणी ईव्हीएममध्ये बिघाड झाल्याचे दिसून आले.(Evm not working in some center of vidarbha)

अमरावती, अकोला, नांदेड आणि वर्ध्यात ईव्हीएममध्ये तांत्रिक बिघाड झाल्याची माहिती आहे.(evn fault at amvrati,akola,nanden,wardha) त्यामुळे मतदान केंद्राबाहेर लांबच लांब रांगा लागल्या. ईव्हीएममध्ये बिघाड होताच निवडणूक अधिकाऱ्यांची मोठी तारांबळ उडाली.(Due to evm fault election officials are in panic)

नांदेडमध्ये सुमारे दीड तासांपासून मतदान यंत्र बंद असल्याची माहिती मिळत आहे. सावरगाव निपाणी या गावामधील हा प्रकार आहे. यामुळे सध्या मतदान प्रक्रिया थांबल्याचं समजत आहे.

वर्ध्याच्या देवळी येथे EVM मशीन बंद पडल्यामुळे मतदान प्रक्रिया थांबली आहे. (In wardha Devli evm stop working) मशीनच बंद पडल्यामुळे कोणीही मतदान करू शकलेलं नाही. अखेर, अधिकाऱ्यांनी मशीन पुन्हा सुरू केल्यानंतर मतदानास देखील सुरुवात झाली आहे.

अमरावतीच्या वडरपुरा भागातील मतदान केंद्रावर देखील EVM मशीनमध्ये बिघाड झाल्याचं समोर येत आहे. सुमारे 15 मिनिटे ही मशीन बंद होती. (evm stop working for 15 minutes) यानंतर अधिकाऱ्यांनी मशीन सुरू केली. आज बुलडाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ-वाशीम, हिंगोली, नांदेड आणि परभणी या ८ लोकसभा मतदारसंघांत मतदान पार पडत आहे.

Latest Posts

Don't Miss