Wednesday, January 15, 2025

Latest Posts

तो संघात होता पण त्याला एकही सामन्यात खेळवलं नाही

Ind Vs Aus T20 Series: सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भारताने  ऑस्ट्रेलियाविरूद्धची मालिका खिशात घातली आहे. शेवटच्या सामन्यात भारतीय संघामध्ये काही बदल पाहायला मिळतील असं सर्वांना वाटत होतं. कारण बिग हिटर असलेल्या खेळाडूल सूर्याने एकाही सामन्यात खेळवलं नाही. (Captian suryakumar yadav did not Included This Player In Playing 11 for all T-20 Matches) या खेळाडूला टीम इंडियाचा भावी युवराज सिंह म्हणून बोललं जातं. नेमका कोण आहे तो खेळाडू?

हा खेळाडू दुसरा तिसरा कोणी नाहीतर शिवम दुबे आहे. शिवब दुबे हा मोठ्या हिटसाठी ओळखला जातो, टी- 20 मध्ये दुबेने अर्धशतक केलं आहे. देशांतर्गत क्रिकेटमध्ये दुबेने दमदार कामगिरी केली होत.त्याने आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्स संघाकडून खेळताना आपली ताकद सर्वांना दाखवून दिली. सीएसकेकडूनही त्याने खेळताना शेवटच्या काही ओव्हर्समध्ये मोठे हिट खेळून पॉवर हिटर असल्याचं दाखवून दिलं होतं. मात्र पाचही टी-20 सामन्यांमध्ये सूर्याने त्याला बेंचवर बसवलं.शिवम दुबे याने मागील सीझनमध्ये 16 सामन्यांमध्ये 418 धावा केल्या होत्या. यामध्ये तीन अर्शशतकाचा समावेश असून 52 हा त्याचा सर्वाधिक स्कोर आहे. आयपीलमधील त्याचा नाबाद 95 स्कोर आहे. शिवमला सूर्याने संधी द्यायला हवी होती म्हणजे संघाला सहावा पर्यायी बॉलरही झाला असता.

Latest Posts

Don't Miss