Monday, January 13, 2025

Latest Posts

तिकडे मतदान सुरु तर इकडे सुप्रिया सुळे अचानक अजित पवार यांच्या घरी

Theonlinereporter.com – May 7, 2024 

Supriya Sule Latest News : बारामती लोकसभा मतदार संघात शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे विरुद्ध अजित पवार यांच्या पत्नी सुनैत्रा पवार यांच्या लढतीकडे देशाचे लक्ष लागले आहे. आज बारामती मतदार संघासाठी मतदान सुरु आहे. (Voting in baramati) त्याचवेळी सुप्रिया सुळे बारामतीमधील काठेवाडीत मतदानासाठी दाखल झाल्या. त्यानंतर त्या थेट अजित पवार यांच्या निवासस्थानी पोहचल्या. (Supriya sule went to ajit pawars home) पाच मिनिटे त्या ठिकाणी होत्या. त्यानंतर त्या निघून गेल्या. त्याची चांगली चर्चा सुरु झाली आहे. सुळे अजित पवारांच्या घरी पोहोचल्या, त्यावेळी अजित पवार आणि त्यांच्या मातोश्री घरी असल्याचं समजतं.(Ajit pawar was at home when sule comes) तर अजित पवारांच्या पत्नी आणि राष्ट्रवादीच्या उमेदवार सुनेत्रा पवार घरी नव्हत्या. त्या मतदारसंघात असल्याचं कळतं. (Supriya sule meet ajit pawar After voting)

शरद पवारांसोबत मतदानाचा हक्क बजावल्यानंतर सुप्रिया सुळे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या भेटीसाठी पोहोचल्या. त्यांनी अजित पवारांचं काटेवाडीतलं घर गाठलं. (Supriya sule at ajit pawars Katewadi home) त्यावेळी घरात अजित पवार आणि त्यांच्या मातोश्री उपस्थित होत्या. सुनेत्रा पवार मतदारसंघात होत्या. सुळे आणि पवार यांच्यात काय चर्चा झाली याचा तपशील अद्याप समोर आलेला नाही. पण मतदान सुरु असताना त्यांची झालेली भेट मतदार, कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्यात संभ्रम निर्माण करणारी आहे.

राजकीय वाटा वेगळ्या झालेल्या असल्या तरी कुटुंब म्हणून आम्ही एकच आहोत, असं पवार परिवारातील सदस्यांना सांगितलं जात होतं. त्यामुळे गेल्या काही दिवसांमध्ये झालेल्या प्रचारानंतर, त्यात झालेल्या टिकेनंतर दोन्ही बाजूंनी कटुता दूर करण्याचे प्रयत्न होतील अशी शक्यता बोलून दाखवली जात होती. पण मतदान सुरु असताना अशा प्रकारची भेट होईल याची कल्पना कोणीही केलेली नव्हती. त्यामुळे ही भेट आश्चर्यजनक मानली जात आहे.

बारामतीत यंदा प्रथमच पवार विरुद्ध पवार असा सामना होत आहे. (In baramati pawar vs pawar)  राष्ट्रवादी काँग्रेस आणि पवार कुटुंबात पडलेली फूट यानंतर पवार कुटुंब प्रथमच निवडणुकीला सामोरं जात असून त्यात सु्प्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशी लढत होत आहे. या लढतीला शरद पवार विरुद्ध अजित पवार यांच्या संघर्षाचीही किनार आहे. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून पवार विरुद्ध पवार असा सामना पाहायला मिळाला. दोन्ही बाजूंनी एकमेकांवर जोरदार टीका झाली.

Latest Posts

Don't Miss