Saturday, January 11, 2025

Latest Posts

एकनाथ शिंदेच्या विरोधात ठाकरे गटाकडून तगडा उमेदवार

| TOR News Network |

Thane constituency Latest News : शिवसेनेचा बालेकिल्ला असणाऱ्या मुंबई आणि ठाण्यात कुणाला उमेदवारी दिली जाणार? हे पाहणं महत्वाचं असणार आहे. अशातच एक मोठी बातमी समोर येत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात ठाकरे गटाने कंबर कसली आहे.(Thackeray vs shinde in thane) शिंदेच्या कोपरी पाचपाखाडी विधान सभा क्षेत्रात ठाकरे गट एका मोठ्या नेत्याला निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याच्या तयारीत आहे. (Thane Kopri Pachapakhadi constituency)

शिवसेना पक्षात फूट पडल्यानंतर एकनाथ शिंदे राज्याचे मुख्यमंत्री झाले. या राजकीय घडामोडींनंतर राज्यात पहिल्यांदाच विधानसभेची निवडणूक होत आहे. ठाण्यातील कोपरी पाचपाखाडी या मतदारसंघात पहिल्यांदाच शिवसेना विरूद्ध शिवसेना अशी लढत पाहायला मिळणार आहे. त्यामुळे यंदाच्या या लढतीकडे राज्याचं लक्ष आहे. अशातच ठाकरेंनी मोठी राजकीय खेळी केली आहे. एकनाथ शिंदे यांचे राजकीय गुरु असणाऱ्या आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे यांना शिंदेंच्या विरोधात रिंगणात उतरवण्याचं ठरवलं आहे.( Anand Dighe Nephew Kedar dighe against cm shinde)

कोपरी पाचपाखाडी विधानसभेत मशाल विरुद्ध धनुष्यबाण लढत होणार आहे. ठाणे शहरातून ठाकरे गटाकडून माजी खासदार राजन विचारे यांना उमेदवारी दिली जाणार असल्याची संधी दिली जाणार आहे. ठाणे शहर विधान सभा क्षेत्रातून त्यांना संधी मिळणार आहे.लोकसभेत पराभव झाल्याने ठाकरेंकडून राजन विचारे यांचं राजकीय पुनर्वसन करण्याचा प्रयत्न आहे.

Latest Posts

Don't Miss