Saturday, January 11, 2025

Latest Posts

IAS पूजा खेडकर प्रकरणात मुंबई पोलिसांचा धक्कादायक खुलासा

| TOR News Network |

Pooja Khedkar Latest News :  प्रोबेशनरी IAS अधिकारी पूजा खेडकर यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.(Pooja khedkar in trouble) पूजा खेडकर प्रकरणाचा पहिला अहवाल राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांना सादर करण्यात आला आहे.(Pooja khedkar first Report) यामध्ये पूजा खेडकर यांचा आणखी एक प्रताप समोर आला आहे.

अहवालात नवी मुंबई प्रकरणाचा उल्लेख आहे. पूजा खेडकर यांनी स्टील चोरी प्रकरणात अटक केलेल्या आपल्या नातेवाईकाची सुटका करण्यासाठी नवी मुंबई पोलिसांवर दबाव आणल्याचा अहवाल नवी मुंबई पोलिसांनी गृह विभागाला सादर केला आहे.(Pooja khedkar pressurised mumbai police) पूजा खेडकर यांनी मे महिन्यात नवी मुंबई पोलीस दलातील पोलीस उपायुक्तांना फोन केला होता.

मी IAS अधिकारी बोलते, संबंधित नातेवाईक निर्दोष असून त्याने केलेला गुन्हा किरकोळ असल्याचं पूजा खेडकर यांनी सांगितलं होतं. नातेवाईकाला सोडण्यासाठी खेडकर यांनी पोलिसांवर दबाव आणला होता. मात्र खेडकर यांच्या फोननंतर देखील पोलीस उपायुक्तांनी आरोपीची सुटका केली नव्हती.

याचा अहवाल बुधवारी मुख्य सचिवांना पाठवण्यात आला आहे. मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी हा अहवाल पुण्याचे जिल्हाधिकाऱ्यांच्या अहवालासह गुरुवारी एलबीएसएनएएचे संचालक श्रीराम तारनिकांती यांना पाठवला आहे.(Chief Secretary Sujata Saunik in pooja khedkar case)

पूजा खेडकर या प्रोबेशनरी अधिकारी असल्याने राज्य सरकार त्यांच्याविरुद्ध कारवाई करू शकत नाही. त्यामुळे केंद्र सरकारकडे हा अहवाल सादर करण्यात आला आहे.

Latest Posts

Don't Miss