Thursday, January 16, 2025

Latest Posts

महाविकास आघाडीला धक्क : हा पक्ष बाहेर पडण्याच्या तयारीत

| TOR News Network |

Mahavikas Aghadi Latest News :  आगामी विधानसभा निवडणुक बघता महाविकास आघाडीचा संयुक्त मेळावा मुंबईत पार पडला. यानिमित्ताने निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडला. मात्र निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीला पहिला धक्का बसण्याची शक्यता आहे. (Shock to Mahavikas Aghadi) महाविकास आघाडीसोबत असलेला एक घटकपक्ष साथ सोडण्याच्या तयारीत आहे. (One Party to Left Mahavikas Aghadi) काल पार पडलेल्या मेळाव्यात त्या पक्षाचे अध्यक्ष अनउपस्थित होते. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधान आले आहे. समाजवादी गणराज्य पार्टीचे (Samajwadi Ganraj Party to left Mahavikas aghadi) अध्यक्ष माजी आमदार कपिल पाटील महाविकास आघाडीची साथ सोडण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळत आहे. (Kapil Patil Latest News)

मुंबईत काल झालेल्या महाविकास आघाडीच्या मेळाव्यात कपिल पाटील हे उपस्थित नव्हते. मुंबई शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीनंतर महाविकास आघाडी आणि कपिल पाटील यांच्यात काहीसा दुरावा निर्माण झाला आहे. तो दिवसेंदिवस वाढतच आहे. मुंबई शिक्षक मतदारसंघासाठी झालेल्या निवडणुकीत कपिल पाटील यांच्या उमेदवारासमोर ठाकरे गटाने उमेदवार दिला होता.(Kapil Patil to left Mahavikas Aghadi )

या निवडणुकीत ठाकरे गटाच्या उमेदवाराचा विजय झाला होता. तर कपिल पाटील यांनी उभ्या केलेल्या उमेदवाराचा पराभव झाला होता. तेव्हापासून कपिल पाटील महाविकास आघाडीवर पाटील नाराज असल्याचं बोललं जात होतं.

या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर कपिल पाटील वेगळी भूमिका घेण्याची शक्यता आहे. कपिल पाटील यांनी आज राज्यभरातील कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केला आहे. मुंबईत गोरेगावमध्ये हा मेळावा पार पडणार आहे. या कार्यक्रमात कपिल पाटील आपली भूमिका जाहीर करणार आहेत. कपिल पाटील हे गोरेगाव विधानसभा निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत. त्यामुळे कपिल पाटील यांच्या भूमिकेकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी राज ठाकरेंची घेतलेली भेट अत्यंत महत्वपूर्ण ठरणार आहे.(Kapil Patil Meet Raj Thackeray)

Latest Posts

Don't Miss