Sunday, January 12, 2025

Latest Posts

विदर्भात शिंदे सेनेची मोठी खेळी ; येवढ्या जागांवर केला दावा

| TOR News Network |

Sanjay Rathod Latest News : विदर्भासह मराठवाड्यावर भाजपचे विशेष लक्ष आहे. लोकसभेचा वचपा काढण्यासाठी भाजप अधिकाधिक जागा लढवण्यावर भर देत आहे. तर दुसरीकडे शिंदे गटाने पण भाजपवर मोठा डाव टाकला आहे.(Shinde sena big game on bjp) विदर्भातील 62 जागांपैकी अर्ध्या जागांच्या जवळपास शिंदे गट विधानसभेसाठी आग्रही आहे. (Shinde sena clam more seats in vidharbha) त्यामुळे अनेक जागांसाठी रस्सीखेच दिसून येईल. तर काही भागात बंडखोरी होण्याची शक्यता आहे.

विदर्भातील 62 पैकी 24 जागांवर शिवसेना शिंदे गटाने दावा ठोकला आहे. (shinde sena clam 24 seats in vidharbha) शिवसेनेच्या शिंदे गटाने विदर्भातील सर्व 62 मतदारसंघात सर्वे केला आहे. त्यात विदर्भातील 24 जागांवर आमची चांगली स्थिती असल्याचा दावा कॅबिनेट मंत्री आणि शिवसेना नेते संजय राठोड यांनी केला आहे.ते गुरुवारी सकाळी नागपूरच्या विमानतळावर प्रसार माध्यमांशी बोलत होते.(minister sanjay rathod on seat sharing in vidharbha) त्यामुळे महायुतीत आम्ही 24 जागा लढणार आहे. आमच्या मित्रपक्षाला आम्ही समजावून सांगू, असे राठोड म्हणाले.

विदर्भातील 11 ही जिल्ह्यात शिवसेना निवडणूक लढणार आहे. विदर्भातील 62 पैकी 24 जागांवर शिवसेना शिंदे गटाने दावा केला आहे. विदर्भातील सर्वच जिल्ह्यात शिवसेना नशीब आजमावणार आहे. त्यातच अजित पवार यांनी सुद्धा विदर्भात जनसंवाद यात्रेद्वारे शक्ती प्रदर्शन केले होते. शिंदे गटाच्या 24 जागांवरील दाव्यामुळे भाजप आणि पवार गटाच्या खात्यात 32 जागा येतील. अर्थात हा दावा दोन्ही पक्षांना किती मान्य होतो हा प्रश्नच आहे. अनेक जागांवर अजून ही महायुतीत रस्सीखेच दिसून येत आहे. विदर्भात भाजपचं पारडं जड असताना त्यांना हा दावा कितपत मान्य होतो हा प्रश्न आहे.

Latest Posts

Don't Miss