Monday, January 13, 2025

Latest Posts

अजितदादांबद्दल शरद पवारांच्या त्या वक्तव्यामुळे उंचावल्या अनेकांच्या भुवया

| TOR News Network |

Sharad Pawar Latest News : लोकसभेनंतर आता विधानसभेतही पवार विरुद्ध पवार असा बारामतीत सामना रंगला आहे. एक बाजी शरद पवार यांनी मारली आहे. तर विधानसभेत अजितदादांचा (Ajit Pawar Latest News) पुन्हा कसल लागणार असल्याचा दावा करण्यात येत आहे. त्यातच युगेंद्र पवार यांच्या प्रचार सभेत बोलताना शरद पवार (Sharad Pawar in Public Meeting) यांनी अजितदादांविषयी केलेल्या एका वक्त्व्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.(Sharad Pawar Shocking Statement)

 तुम्ही मला जेव्हा निवडून दिलं तेव्हा मी विधानसभेत गेल्यावर एखादी योजना इथे करता येईल का असा विचार केला होता. एका योजनेतून या भागात काहीसे पाणी यायला लागलं. दूध संघाची सुरुवात आम्ही केली ते नंतर १ लाख लिटर वर गेलं. आम्ही हे दूध पुण्यात पोहचवले. डायनॅमिक कंपनी बारामती मध्ये आली. तिथे ८ लाख दूध येतं आणि त्यावर प्रक्रिया होते. शेती संकटात असेल तर दुसरा जोड धंदा पाहिजे राजकारण फक्त सत्ता आणि निवडणुकीसाठी नाही. राजकारणाचा वापर लोकांच्या जीवनात झाला तर त्याचा उपयोग आहे, असे शरद पवार म्हणाले.

तुम्ही ४ वेळा मला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री केलं, २५ वर्ष मी बारामती मध्ये काम केलं. पुढची सत्ता अजित दादांच्या हातात दिली आणि निर्णय तुम्ही घ्यायचं सांगितलं. ३० वर्ष अजित पवारांनी कामं केलं, माझ्या मनात त्यांच्याबद्दल त्या संदर्भात कुठली ही तक्रार नाही, असे मोठे वक्तव्य शरद पवार यांनी केले.(Shard Pawar statement on ajit pawar) त्यामुळे राजकीय विश्लेषकांच्या भुवया उंचावल्या आहेत. पुढची तयारी करायची असेल तर नेतृत्व तयार करावं लागेल. नवीन नेतृत्व तयार करायचं आहे म्हणून युगेंद्रची उमेदवारी दिली.(sharad pawar on yugendra pawar) मी मत मागायला आलो नाही, तुम्ही मला मतं द्यायला कधी काट कसर केली नाही. माझी निवडणूक असो, अजित दादा ची निवडणूक असो, सुप्रियाची असो तुम्ही कधी नाही म्हणाला नाहीत. लोकसभा कौटुंबिक राजकारणाची होती तरी तुम्ही सुप्रियाला मतदान केलं, असं ते म्हणाले.

Latest Posts

Don't Miss