Saturday, January 11, 2025

Latest Posts

शरद पवारांचा नंबर गेम ; विधानसभेत एवढ्या जागा जिंकणार

| TOR News Network |

Sharad Pawar On Vidhansabha Seats : लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने राज्यात जोरदार मुसंडी मारत 48 पैकी 31 जागा जिंकत महायुतीचा धुव्वा उडवला. त्यानंतर महाविकास आघाडीत प्रवेश करण्याची स्पर्धा सुरू झाली आहे. त्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आघाडीवर आहे.(Incoming In Sharad Pawar Group) आजही भाजपचे माजी आमदार सुधाकर भालेराव यांनी शरद पवार गटात प्रवेश केला. त्यामुळे शरद पवार गटाची ताकद दिवसेंदिवस वाढत आहेत. शिवाय सध्याच्या स्थितीत महाविकास आघाडीला किती जागा मिळतील याचा अंदाजही सांगितला.(Sharad Pawar Claim number of mla to win vidhansabha) लोकसभा निवडणुकीत मविआला किती जागा मिळतील हा शरद पवारांचा अंदाज अत्यंत तंतोतंत बरोबर होता.

2019 साली लोकसभा निवडणुकीत विरोधकांना 48 पैकी 06 जागांवर विजय मिळाला होता. त्यातल्या चार जागा ह्या राष्ट्रवादी काँग्रेसने जिंकल्या होत्या असे शरद पवार यांनी सांगितले. पण गेल्या दहा वर्षात महाराष्ट्रातल्या जनतेला वेगळा अनुभव आला. त्यामुळे त्यांनी निश्चिय केला. बदल झाला पाहीजे हे त्यांच्या मनात होते. त्यामुळेच लोकसभेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत विरोधकांना तब्बल 31 जागांवर विजय मिळाला. आता राज्यही चुकीच्या लोकांच्या हातात आहे हे जनतेला समजले आहे.(Maharashtra in wrong Hands) त्यामुळे जनता पुन्हा एकदा बदल करण्याच्या मनस्थितीत आहे. (people want change) सध्याची जी परिस्थिती दिसते त्यानुसार महाविकास आघाडीला 288 पैकी 225  जागा मिळतील अशी स्थिती आहे असे ते यावेळी म्हणाले. (mahavikas Aghadi to get 225 seats in vidhansabha) त्यामुळे आता पासूनच कामाला लागा. तुम्हाला ताकद देण्याची माझी जबाबदारी आहे असेही ते म्हणाले.(i will provide power to you ) जर या सरकारला घालवायचे असेल तर राष्ट्रवादी काँग्रेसला ताकद देण्याची गरज असल्याचे शरद पवार यावेळी म्हणाले.

लोकसभा निवडणुका झाल्यानंतर राज्यातून ठिकठिकाणचे नेते कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करत आहेत. (many party workers joining Ncp )महाराष्ट्राचे चित्र सध्या बदलत आहे. अशा स्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसला शक्ती देणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले. जनतेचे प्रश्न आपल्याला सोडवायचे आहेत. त्यासाठी जबरदस्त शक्ती आपल्याला उभी करावी लागेल. राज्यात सत्ता बदल करायचा आहे. सत्ता बदलानंतर राज्यातल्या जनतेचे जिवनमान बदलायचे आहे. प्रत्येक घटकातील जाती, धर्माच्या लोकांचे जिवनमान उंचावयाचे आहे असेही पवार म्हणाले. त्यामुळे कामाला लागा राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आणूयात असेही ते यावेळी म्हणाले.

Latest Posts

Don't Miss