Saturday, January 11, 2025

Latest Posts

शरद पवार यांच्या बहिणीचे प्रथमच मोठे वक्तव्य..त्या म्हणाल्या..

| TOR News Network | Sharad Pawar Sisters Statement : शरद पवार यांच्या बहिण आणि अजित पवार यांच्या आत्या सरोज पाटील यांनी पवार कुटुंबातील वादा बद्दल प्रथमच भाष्य केले आहे.त्या म्हणाल्यात “गट फुटला म्हणून पवार कुटुंबात फूट पडलेली नाही. निवडणुकीनंतर जे निवडून येतील ते येतील. आम्ही नेहमी राजकीय चपला बाहेर काढून आता येतो. हे निवडणुकीपर्यंत हे ढग आहे, निवडणूक संपली की हे ढग निघून जातील, असे स्पष्ट मत त्यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केले.(Saroj pawar on ajit and sharad pawar)

निवडणुका झाल्यावर सर्व संपेल

पवार कुटुंबात फूट नाही. निवडणूक होईल, जे निवडून येतील ते येतील. निवडणुका झाल्यावर सर्व संपेल. राजकारण आम्ही कधी घरात आणत नाही. शरद पवार नेहमी स्वत:च्या ताटापेक्षा बहिणीच्या ताटात काय आहे, हे पाहत आले. यामुळे पवार कुटुंबात काहीच होणार नाही. राजकारणात एन.डी.पाटील शरद पवार यांच्यावर टीका करत होते. आता अजित पवार किंवा श्रीनिवास पवार काय बोलला हे निवडणूक संपले की संपेल. हे ढग निघून जातील. लोकांनी कोणाच्या बाजूने उभे राहवे, हे लोकांनी ठरवावे, असे उत्तर सरोज पाटील यांनी दिले.

भाजपकडे खूप पैसा आहे, ते काहीही करु शकतात

सरोज पाटील पुढे म्हणाल्या, ”पवार कुटुंबात राजकारण्यांनी घडवलेल्या फुटीबाबत प्रचंड वाईट वाटत आहे. दु:खही खूप वाटत आहे. भाजपचा रोख सर्व शरद पवार यांच्यावर आहे. शरद पवार यांना संपवण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. भाजपकडे खूप पैसा आहे. त्या जोरावर ते काहीही करु शकतात. अजित यांचा तोल थोडा सुटला असणार…पण त्यालाही दु:ख झाले असले. अजित चुकाला आहे की नाही, मला कळत नाही. परंतु शरद संदर्भात त्यांच्या तोंडातून जी भाषा आली, ते बोलण्याच्या ओघात आली असले. त्यांच्या मनात तसे काहीच नसेल. त्याला लहानपणापासून मी ओळखतो. तो संवेदनशील आहे. त्याला पश्चताप अन् दु:खही झाले असेल.”

या सर्व प्रकारामुळे आमच्या कुटुंबाला तडा जाणार नाही

सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांच्यात कोण विजयी होणार? यावर बोलताना सरोज पाटील म्हणाल्या, माझे दोघांवर प्रचंड प्रेम आहे. सुनेत्रा गोड आहे. सुप्रियाचे मला आश्चर्य वाटते. ती सोन्याचा चमचा घेऊन जन्मला आली. तिला आम्ही फुलासारखे वागवले. ती इंग्रजी माध्यमात शिकली. त्यानंतर तिने स्वत:मध्ये प्रचंड बदल केला. तिच्या लोकसभेतील भाषणाला विरोधकही दादा देतात. आता ती मराठी उत्तम बोलते, हिंदी चांगली बोलते. परंतु या सर्व प्रकारामुळे आमच्या कुटुंबाला तडा जाणार नाही, हे निश्चित आहे.

Latest Posts

Don't Miss